'सन्मान केवळ माझा नाही...' हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष गौरव, छाया कदम भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम यांचा हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान मिळाल्यानंतर छाया कदम यांनी भावुक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
1/8

अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाची छाप केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवली. कान फिल्म फेस्टिव्हल सारख्या अनेक मोठ्या फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांच्या सिनेमाचा आणि अभिनयाचा गौरव करण्यात आला.
advertisement
2/8
छाया कदम यांच्या कामाची हिमाचल प्रदेश सरकारकजून घेण्यात आली. त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. छाया कदम यांनी भावुक पोस्ट लिहीत ही माहिती दिली.
advertisement
3/8
छाया कदम यांनी लिहिलंय, "हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे."
advertisement
4/8
"11 व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. आणि सोबतच ‘लाल’ या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली."
advertisement
5/8
छाया कदम यांनी पुढे लिहिलंय, "या सगळ्या सोबतच एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला."
advertisement
6/8
"त्या सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे."
advertisement
7/8
"या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमला मधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या."
advertisement
8/8
"इथली माणसं - त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले. खूप आनंद आणि एक कलाकार म्हणून खूप समाधान."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सन्मान केवळ माझा नाही...' हिमाचल प्रदेश सरकारकडून विशेष गौरव, छाया कदम भावुक