TRENDING:

MBA झालेला तरुण करतोय नोकरी सोडून शेती, एकाच फळातून आता लाखोंची कमाई

Last Updated:
MBA झालेला तरुण शेती करतोय. आता त्याचा माल थेट गुजरातच्या बाजारात जात आहे.
advertisement
1/7
MBA झालेला तरुण करतोय नोकरी सोडून शेती, एकाच फळातून आता लाखोंची कमाई
शेतीपुढे अनेक आव्हाने असताना देखील या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग शेतकरी करत आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकरी देखील यामध्ये मागे राहिलेले नाहीत. जिल्ह्यातील हसनाबाद येथील शेतकरी मनोज लाठी यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पेरूची शेती केली.
advertisement
2/7
विशेष म्हणजे त्यांचा मुलगा प्रफुल्ल याने एमबीएनंतर चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीचा निर्णय घेतला. आता त्यांनी पिकवलेले पेरू थेट गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पेरूची चव सुरत मधील खवय्यांना चाखायला मिळत आहे.
advertisement
3/7
भोकरदन तालुक्यातील हसनाबादचे रहिवासी असलेल्या मनोज लाठी हे आधी ठेकेदार होते. काही दिवस त्यांनी वीट भट्टीचा व्यवसाय देखील केला. आणखी देखील काही व्यवसाय करून पाहिले. मात्र त्यात हवे ते यश त्यांना मिळाले नाही. मग 2017 पासून त्यांनी आपल्या 16 एकर वडिलोपार्जित जमिनीत वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली.
advertisement
4/7
युट्युबवर पाहून मुलाच्या सल्ल्याने त्यांनी छत्तीसगढ येथील रायपूर येथून 1 हजार पेरू रोपे खरेदी केली. या रोपांची त्यांनी 8 बाय 12 अंतरावर आपल्या शेतात लागवड केली. लागवडी नंतर पहिल्या वर्ष बऱ्यापैकी उत्पन्न झाले. मात्र मागील दोन तीन वर्ष त्यांची पेरू बाग तोट्यात होती. दरम्यानच्या काळात त्यांनी यात अनेक वेगवेगळी पिके घेऊन झालेलं नुकसान भरून काढलं.
advertisement
5/7
यंदा मात्र त्यांनी पेरू बागेचे व्यवस्थित नियोजन केले. शेण खत आणि गांडूळ खताची मात्रा दिली. गाईच्या शेण आणि मुत्र यापासून तयार केलेली स्लरी झाडांना दिली. त्यामुळे यंदा पेरूची 20 ते 25 टन उत्पन्न त्यांच्या हाती येणार आहे. यंदा आम्ही पेरू फळे लहान असतानाच त्यांना आवरण बसविले.
advertisement
6/7
यामुळे फळाला रोग कीडचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच यामुळे थेट ग्राहकांपर्यंत स्पर्श विरहित माल पोहचवत आहे. आम्ही 23 क्विंटलची एक गाडी सुरतला पाठवली असून तिला 48 रुपये प्रतिकीलो एवढं दर मिळाला आहे. यंदा यातून आम्हाला 10 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा असल्याचे मनोज लाठी यांनी सांगितले.
advertisement
7/7
माझं MBA marketing झालं आहे. 50 हजार रुपये पगाराची नोकरी देखील मला होती. नोकरी सोडून मी शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय. तसेच वडिलांना मदत देखील करतोय. नोकरी मध्ये मला इंटरेस्ट नव्हता. शेतीमध्ये जास्त रस असल्याने नोकरी सोडून मी शेती मध्ये आणखी काय करता येईल यावर काम करत असल्याचं मनोज लाठी यांचा मोठा मुलगा प्रफुल्ल याने सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
MBA झालेला तरुण करतोय नोकरी सोडून शेती, एकाच फळातून आता लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल