दिवसाला 6 हजार कमावतो जालन्याचा शेतकरी, कंपनीच्या मॅनेजरपेक्षाही अधिक उत्पन्न; कसं झालं शक्य?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतीत वेगळा प्रयोग केला आणि 7 महिन्यांत 7 लाखांचं उत्पन्न घेतलं.
advertisement
1/7

अलिकडे उच्च शिक्षित तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून ते या क्षेत्रात स्वतः ला झोकून देत आहेत. वेगवेगळे प्रयोग करून आपले उत्पन्न देखील ते वाढवत आहेत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहरात रेशीम बाजारपेठ उपलब्ध झाल्यापासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे वळत आहेत.
advertisement
2/7
योग्य नियोजन करून या शेतीमधून मोठा आर्थिक फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. अवघ्या 21 दिवसांच्या एका बॅचमधून लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने घेतलंय. त्यामुळे जालना जिल्ह्यातील निपाणी पिंपळगावचे रहिवाशी असलेले सोमेश्वर वैद्य यांच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
3/7
सोमेश्वर वैद्य हे मोसंबी उत्पादक शेतकरी होते. त्यांच्याकडे तब्बल 2 हजार मोसंबीची झाडे होती. मात्र मोसंबीवर येत असलेल्या रोगांमुळे ते निराश झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी ते रेशीम शेतकडे वळले. जून 2022 मध्ये त्यांनी आपल्या दोन एकर शेतात तुती लागवड केली.
advertisement
4/7
योग्य नियोजन करून पहिल्याच बॅच मध्ये त्यांना 70 हजार रुपये अवघ्या 21 दिवसात मिळाले. यानंतर त्यांनी या कामात सातत्य राखले अन् प्रत्येक बॅचला रेशीम कोष उत्पादन वाढत गेले. आता 1 लाख 17 हजार रुपये वैद्य यांनी एका बॅचमधून मिळवले आहेत.
advertisement
5/7
मी जून 2022 मध्ये तुती लागवड करून 24 ऑक्टोबरला शेतावर 200 चॉकी घेतली. 24 आक्टोबार 2022 पासून ते 7 ऑगस्ट 2023 पर्यंत सात बॅचेस मी घेतल्या. दोन एकरातील या सात बॅचमधून मला सात लाख रुपये उत्पन्न झाले, असे वैद्य सांगतात.
advertisement
6/7
रेशीम कोष विक्रीच्या पावती बाबत बोलायचे झाल्यास 1 लाख 17 हजार ही माझी सगळ्यात मोठी कोष विक्रीची पावती आहे. 2022 मध्ये रेशीम कोश दर खूप चांगले होते. एप्रिलपासून दर काहीसे कमी झाले आहेत. तरीदेखील 40 ते 50 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत असल्याचे शेतकरी सोमेश्वर वैद्य यांनी सांगितले.
advertisement
7/7
जालना जिल्ह्यातील शेतकरी सोमेश्वर वैद्य यांनी सात महिन्यात तब्बल सात लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवले आहे. म्हणजे त्यांनी महिन्याला एक लाख रुपये सरासरी उत्पन्न मिळवले आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी जिल्हा स्तरावरून देखील प्रयत्न होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
दिवसाला 6 हजार कमावतो जालन्याचा शेतकरी, कंपनीच्या मॅनेजरपेक्षाही अधिक उत्पन्न; कसं झालं शक्य?