TRENDING:

दुष्काळी माणमध्ये केळीची शेती; इराक, इराणला निर्यात अन् एकरी 15 लाखांचे उत्पन्न

Last Updated:
दुष्काळी माण तालुक्यात एका शेतकऱ्याने केळीची शेती केली असून त्याची निर्यात इराक, इराणला होत आहे.
advertisement
1/6
दुष्काळी माणमध्ये केळीची शेती; इराक, इराणला निर्यात अन् एकरी 15 लाखांचे उत्पन्न
सध्याच्या काळात दुष्काळी भागातील शेतकरीही आधुनिक पद्धतीने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची शेती करत आहेत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्ह्यातील</a> माण, खटाव तालुक्यांचा परिसर दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. परंतु, माणमधील आंधळी गावचे शेतकरी अशोक शेंडे यांनी आपल्या शेतात खास प्रयोग केलाय. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणाऱ्या ठिकाणी त्यांनी केळीची शेती केली. आता ही केळी इराकला निर्यात करून त्यांना चांगला नफा होतोय.
advertisement
2/6
अशोक शेंडे हे दुष्काळी माण तालुक्यातील आंधळी येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या अडीच एकरात वसईच्या केळीची लागवड केली. केळी लागवड करताना अनेकांनी त्यांना पाण्यामुळे केळीची लागवड करू नये, असा सल्ला दिला. मात्र दुष्काळावर मात करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड करून त्यांनी संगोपन करून दाखवले. त्यामुळे केळीला फळधारणाही चांगली आहे.
advertisement
3/6
केळीची लागवड करताना 10 फुटाचे अंतर ठेवले. केळीच्या झाडाला लाकडी बांबूचा सपोर्ट न देता त्यांनी पट्टा पद्धतीचा वापर केला. तीन महिन्यांपूर्वी कच्ची बांधणी करून सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा बांधणी केली आहे.
advertisement
4/6
पहिल्या बांधणी वेळी सहा ट्रॉली शेणखत, वनखत, सेंद्रिय खत, या प्रकारची खते वापरून याचे संगोपन केले, असे शेंडे यांनी सांगितले.
advertisement
5/6
शेतकरी शेंडे हे केळीची निर्यात परदेशातही करतात. त्यामुळे दुष्काळी माणमधील केळीने इराक, इराणमधील बाजारपेठा सजल्या आहेत. शेंडे यांनी पिकवलेल्या केळीला परदेशात मागणी आहे. त्यामुळे माण खटाव सारख्या दुष्काळी भागात शेंडे यांना जवळपास 30 ते 35 लाखांचे उत्पन्न वसई केळीच्या उत्पादनातून मिळाले आहे.
advertisement
6/6
केळीच्या एका घडाला तब्बल 40 ते 45 किलो पर्यंतचा माल मिळत आहे. त्यामुळे एका एकर मधून 15 लाखापर्यंतचे सरासरी उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर अडीच एकरामधून तब्बल 40 ते 45 लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर युवा पिढीने नोकरी मागे न धावता शेती करावी असा एक कानमंत्र देखील शेंडे यांनी दिला आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
दुष्काळी माणमध्ये केळीची शेती; इराक, इराणला निर्यात अन् एकरी 15 लाखांचे उत्पन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल