Canara Bank: लाखो ग्राहकांसाठी गुडन्यूज! सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Minimum Balance वर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही! सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा मोठा निर्णय
advertisement
1/7

मुंबई: देशातील सार्वजनिक बँका ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेताना दिसत आहेत. खासगी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक बँकांचं कामकाज आणि प्रक्रिया थोडी किचकट असली तरीसुद्धा ग्राहकांना वेळोवेळी दिलासादायक निर्णय या बँका घेत असतात.
advertisement
2/7
देशातील सर्वात मोठ्या सर्वाजनिक बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे. सेविंग अकाउंटवर मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट प्रत्येक बँकेकडून आहे. मात्र या बँकेनं मिनिमम बॅलन्सचे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
3/7
बँकेच्या नियमानुसार मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर अशा ग्राहकांना बँक शुल्क आकारते. हा नियम आता ग्राहकांसाठी लागू होणार नाही. ग्राहकांना मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
advertisement
4/7
1 जून 2025 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. कॅनरा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचं या बँकेत खातं आहे त्यांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
5/7
सॅलरी अकाउंट, सेविंग अकाउंट, एनआरआय एकाउंटसाठी मिनिमम बॅलन्सची कोणतीही अट नाही. शिवाय त्यावर शुल्क आकारलं जाणार नाही असं बँकेनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. बँक खात्यात किमान रकमेपेक्षा कमी रक्कम जमा केल्यास खातेधारकावर कोणताही दंड आकारला जाणार नाही.
advertisement
6/7
जर तुमचे कॅनरा बँकेत खाते असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात शून्य शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे लाखो ग्राहक, वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
7/7
इतर बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक आहे. ग्रामीण, नीम शहरी आणि शहरी भागांसाठी बँकेचे मिनिमम रक्कम ठेवण्याचे आणि शुल्क आकारण्याचे नियम बदलतात. त्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या बँक शाखेतून घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Canara Bank: लाखो ग्राहकांसाठी गुडन्यूज! सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा मोठा निर्णय