TRENDING:

पुढे काही तरी मोठं घडणार, Gold-Silverची ही तेजी नाही, इशारा आहे; 24 तासात असं काही घडलं की सिस्टीम डगमगली

Last Updated:
Gold And Silver Prices: गेल्या 24 तासांत सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये झालेली अचानक उसळी ही केवळ बाजारातील हालचाल नसून, जागतिक भीतीचं स्पष्ट संकेत मानली जात आहे. फेड धोरणातील अनिश्चितता, वाढता भू-राजकीय तणाव आणि डॉलरची कमजोरी यामुळे सेफ-हेवनकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वळताना दिसते आहे.
advertisement
1/9
पुढे काही तरी मोठं घडणार, Gold-Silverची ही तेजी नाही, इशारा आहे; 24 तासात...
जागतिक बाजारात सोनं आणि चांदीमध्ये आलेली ही जोरदार तेजी अचानक नाही, तर तिच्यामागे काही अतिशय मोठी आणि गंभीर कारणं आहेत. सध्या गोल्ड आणि सिल्व्हर दोन्ही ‘सेफ-हेवन’ म्हणून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे केंद्रबिंदू ठरत असून, पुढील काळात ही रॅली आणखी तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
advertisement
2/9
गेल्या 24 तासांत सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक वेगळीच उसळी पाहायला मिळाली आहे. सोनं एका नव्या ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळ पोहोचलं असून, चांदीतही जबरदस्त तेजी कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, ही रॅली नेमकी का सुरू आहे? आणि अजून एखादा मोठा स्फोटक टप्पा बाकी आहे का?
advertisement
3/9
या रॅलीमागील सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल यांच्यावरील चौकशी. या चौकशीमुळे संपूर्ण जागतिक बाजारात पॉलिसी संदर्भातील अनिश्चितता प्रचंड वाढली आहे. फेडच्या वॉशिंग्टन मुख्यालयाच्या सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सच्या नूतनीकरण प्रकल्पाबाबत आणि काँग्रेससमोरील पावेल यांच्या साक्षीबाबत फेडरल प्रॉसिक्यूटर तपास करत आहेत.
advertisement
4/9
या चौकशीमुळे बाजारात चर्चांना उधाण आलं आहे. जर या प्रकरणाचा शेवट पावेल यांना वेळेआधी पद सोडावं लागण्यात झाला आणि त्यांच्या जागी व्याजदर कपातीला अधिक अनुकूल असा नवा चेअरमन आला, तर सोन्यासाठी ते मोठं वरदान ठरेल, अशी धारणा आहे. कारण कमी व्याजदर हे सोन्याच्या तेजीचं सर्वात मोठं इंधन मानलं जातं. हाच धोका आणि त्याच वेळी असलेली अपेक्षा यामुळे गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरांनी वेग पकडला आहे.
advertisement
5/9
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढता भू-राजकीय तणाव. सध्या जग दोन मोठ्या आघाड्यांवर पुन्हा एकदा अस्थिरतेकडे झुकताना दिसत आहे. इराणबाबत अमेरिकेकडून मिळणारे संकेत अधिक आक्रमक होत आहेत. इराणमध्ये वाढणाऱ्या असंतोषावर “कारवाई”चे पर्याय खुले असल्याचं अमेरिकेने सूचित केल्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी धोकादायक मालमत्तांमधून पैसा काढून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
advertisement
6/9
त्याचवेळी व्हेनेझुएलातील घडामोडींनीही जागतिक बाजार हादरवून टाकला आहे. वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर, जगाला एक स्पष्ट संदेश मिळाला; भू-राजकीय आग कुठेही, केव्हाही भडकू शकते. अशा अस्थिर वातावरणात सोनं आणि चांदी हेच सर्वात आधी सुरक्षित पर्याय म्हणून चमकतात.
advertisement
7/9
तिसरं आणि सर्वात मजबूत कारण म्हणजे डॉलरची कमजोरी. सध्या डॉलरचा सूर नरम असून, जागतिक बँकिंग सेंटिमेंट सोन्याच्या बाजूने झुकलेला आहे. HSBC सारख्या आघाडीच्या बँकांचे मत आहे की सोन्यातील मोमेंटम इतका मजबूत आहे की 2026 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याचा दर 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो.
advertisement
8/9
यामागे अनेक कारणं आहेत? सातत्याने वाढत असलेली फिस्कल तूट, धोरणात्मक अनिश्चितता, डॉलरचा दबावाखाली असलेला दर, आणि जगभरातील सेंट्रल बँकांकडून होणारी मोठ्या प्रमाणातील सोन्याची खरेदी. 2025 मध्ये सोन्याने तब्बल 65 टक्के वार्षिक परतावा दिला होता. आता 2026 च्या सुरुवातीलाच त्याची गती इतकी वेगवान आहे की बाजाराला वाटतंय, ही कहाणी अजून संपलेली नाही.
advertisement
9/9
पुढे काय? मार्केट एक्सपर्ट्स स्पष्टपणे सांगतात की ही रॅली सध्या संपण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. जेरोम पावेलवरील चौकशीचा निकाल हा पुढील काळात मोठा ट्रिगर ठरू शकतो. इराण आणि व्हेनेझुएलातील परिस्थिती कोणत्याही क्षणी बाजारात मोठी उलथापालथ घडवू शकते. तसेच डॉलर आणि व्याजदरांचा पुढील कल सोनं आणि चांदीला नव्या उच्चांकावर घेऊन जाऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
पुढे काही तरी मोठं घडणार, Gold-Silverची ही तेजी नाही, इशारा आहे; 24 तासात असं काही घडलं की सिस्टीम डगमगली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल