TRENDING:

Gold Silver Rate : स्वस्त होतंय सोनं! पाच दिवसात दर 3 हजारांनी घसरले, चांदीने मात्र खाल्ला भाव

Last Updated:
नितीन नांदुरकर, जळगाव : सोन्याने पाच दिवसांपूर्वी दराचा उच्चांक गाठला होता. 700 रुपयांच्या वाढीसह सोन्याने 20 मे रोजी 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता.
advertisement
1/5
स्वस्त होतंय सोनं! पाच दिवसात दर 3 हजारांनी घसरले, चांदीने मात्र खाल्ला भाव
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात पाच दिवसांपूर्वी सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत चार वेळा उतरले आहेत. त्यामुळे 20 मे रोजी 75 हजार 100 रुपयांची विक्रमी पातळी गाठलेल्या सोन्याचे दर शनिवार 25 रोजी 72 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम असे होते.
advertisement
2/5
गेल्या पाच दिवसांत सोन्याचे भाव 2900 रुपयांनी घसरले आहेत. दुसरीकडे चांदीने मात्र भाव खाल्ला असून दरात फारसा बदल झालेला नाही. चांदीचे दर 93 हजार 500 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
advertisement
3/5
सोन्याने पाच दिवसांपूर्वी दराचा उच्चांक गाठला होता. 700 रुपयांच्या वाढीसह सोन्याने 20 मे रोजी 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर 22 रोजीच्या 100 रुपयांच्या वाढीचा अपवाद वगळता सोन्याचे भाव कमी कमीच होत गेले आहेत.
advertisement
4/5
21 मे रोजी 800 रुपये, 23 मे रोजी तर 1100 रुपये, 24 मे रोजी 900 रुपये आणि २५ रोजी 200 रुपयांनी सोन्याचे भाव उतरले आहेत. अशाप्रकारे गेल्या पाच दिवसांत केवळ एकदाच 100 रुपयांची वाढ आणि चार वेळा मिळून 3 हजार रुपयांची घसरण असे सोन्याच्या बाजाराचे चित्र राहिले.
advertisement
5/5
शेअर बाजार उसळी घेत असल्याने तिकडे गुंतवणूक वाढत असल्याने सोन्याचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून चांदी मात्र 93 हजार 500 रुपयांवर स्थिर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Rate : स्वस्त होतंय सोनं! पाच दिवसात दर 3 हजारांनी घसरले, चांदीने मात्र खाल्ला भाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल