TRENDING:

बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देते 20 लाखांपर्यंत लोन! पहा ही स्किम आहे तरी काय

Last Updated:
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, बँका शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस या 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज देतात.
advertisement
1/6
बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देते 20 लाखांपर्यंत लोन! पहा ही स्किम आहे तरी काय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश बिगर-कॉर्पोरेट, बिगर-कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंतचे सोपे आणि तारणमुक्त सूक्ष्म कर्ज प्रदान करणे आहे.
advertisement
2/6
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून थेट 20 लाख रुपये केली होती. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट पुढे नेण्याच्या उद्देशाने सरकारने कर्ज लिमिटमध्ये मोठी वाढ केली होती.
advertisement
3/6
PMMY मध्ये 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध आहे : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, बँका शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस या 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज प्रदान करतात. शिशु श्रेणीमध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, किशोर श्रेणीमध्ये 50,000 ते 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तरुण श्रेणीमध्ये 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
advertisement
4/6
तरुण प्लस श्रेणीमध्ये 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तरुण प्लस अंतर्गत कर्ज फक्त अशा उद्योजकांना दिले जाते ज्यांनी पूर्वी तरुण श्रेणी अंतर्गत कर्ज घेतले होते आणि ते वेळेवर परत केले होते.
advertisement
5/6
कर्ज परतफेड करण्यासाठी किती वेळ दिला जातो, किती व्याज आकारले जाईल : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी दिला जातो, ज्यामध्ये जास्तीत जास्त 6 महिन्यांचा मोरेटोरियम कालावधी समाविष्ट असतो. तर, 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षे दिली जातात. ज्यामध्ये 12 महिन्यांचा कमाल मोरेटोरियम कालावधी समाविष्ट आहे.
advertisement
6/6
एसबीआयच्या मते, मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जासाठी ईबीएलआरसह 3.25 टक्के अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. मुद्रा योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेशी बोलू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देते 20 लाखांपर्यंत लोन! पहा ही स्किम आहे तरी काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल