TRENDING:

Jalgaon Gold Rate : सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात आठवडाभरात 950 रुपयांनी वाढ! भाव आणखी वाढणार का?

Last Updated:
Jalgaon Gold Rate : लग्नसराई सुरु असताना सोन्याला प्रचंड मागणी असते. मात्र याच काळात सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.
advertisement
1/5
सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात आठवडाभरात 950 रुपयांनी वाढ! भाव आणखी वाढणार?
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळताय. मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढच होतेय. महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातही सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढताय.
advertisement
2/5
जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेजी आली होती. तशीच तेजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची चिन्ह आहेत. शनिवारी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात 950 रुपये वाढ झाली.
advertisement
3/5
नोव्हेंबर महिन्यात 62 हजारांच्या घरात असलेल्या सोन्याचे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 900 रुपयांनी वाढून 65 हजार 96 रुपये प्रति तोळा झाले होते.
advertisement
4/5
4 डिसेंबर रोजी सोन्याचे भाव 66,229 रुपयांवर पोहोचले होते. दुसऱ्याच दिवशी 1300 रुपयांची घसरण होऊन दर 64,890 रुपये झाले.
advertisement
5/5
ही घसरण चालूच राहत गेल्या पंधरवड्यामध्ये सोन्याचे दर हे 62 हजारांवर होते. त्यामध्ये 23 डिसेंबरला पुन्हा 350 रुपयांची वाढ झाली आणि तीन टक्के जीएसटीसह दर 65,250 रुपये एवढे झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Jalgaon Gold Rate : सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात आठवडाभरात 950 रुपयांनी वाढ! भाव आणखी वाढणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल