Ladki Bahin Yojana: ज्यांनी EKYC केलं त्यांनाही अजून मिळाले नाहीत पैसे, नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीमुळे अडकले असून EKYC केल्यावरच हप्ता मिळणार आहे. आदिती तटकरे यांनी तातडीने EKYC करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
1/7

लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू असल्याने लाडक्या बहि‍णींचे पैसे अडकले आहेत. अजूनही लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळालेला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
2/7
दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. 2-3 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक आहे. या काळात महिलांच्या खात्यावर पैसे जमा करता येणार नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी हप्ता मिळणार नाही.
advertisement
3/7
लाडकी बहीण योजनेत EKYC करण्याची मुदच १८ नोव्हेंबर होती. ती वाढवून आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. ज्यांनी EKYC केलं नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केलं नसेल तर तातडीनं करुन घ्या.
advertisement
4/7
नोव्हेंबरचा हप्ता १० डिसेंबरनंतर दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीमुळे तारीख लांबण्याची शक्यता आहे. हप्ता कधी येणार याबाबत देखील आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली नाही. निवडणुकीमुळे आता
advertisement
5/7
महिलांना दोन्ही हप्ता EKYC केल्यानंतर एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. ज्यांनी EKYC केलं नाही त्यांनी तातडीने करुन घ्यावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. जर ते केलं नाही तर तुमचं नाव यादीतून वगळण्यात येईल. यासोबत वडील आणि पती नाहीत त्यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
6/7
लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळतात. अडीच लाखपेक्षा उत्पन्न कमी, महाराष्ट्रातील रहिवासी आणि एका घरातील दोन पेक्षा जास्त महिला लाभार्थी नसाव्यात, याशिवाय घरात चारचाकी गाडी नसावी अशी अट आहे.
advertisement
7/7
लाडकी बहीण योजनेचे EKYC करण्यासाठी तुम्ही ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा. सेंड OTP' बटणावर क्लिक करा. तुमच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana: ज्यांनी EKYC केलं त्यांनाही अजून मिळाले नाहीत पैसे, नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार?