TRENDING:

आजपासून 4 मोठे बदल! गॅस स्वस्त, प्रवास महागला; १ डिसेंबरपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर थेट परिणाम

Last Updated:
१ डिसेंबरपासून व्यावसायिक एलपीजी स्वस्त, ATF महाग, UPS निवडण्याची मुदत संपली, बँकांना १७ सुट्ट्या, HSRP नंबर प्लेटसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.
advertisement
1/6
आजपासून 4 मोठे बदल! गॅस स्वस्त, प्रवास महागला; १ डिसेंबरपासून बदलले नियम
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच झालेले काही बदल सर्वसामान्य नागरिकांसाठी एका बाजूला दिलासा घेऊन आले आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही धक्के देखील बसले आहेत. आज, १ डिसेंबरपासून व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडर स्वस्त झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्यांचा खर्च कमी झाला आहे. मात्र, त्याच वेळी विमान कंपन्यांसाठी वापरले जाणारे इंधन महाग झाल्याने याचा थेट भार हवाई प्रवाशांच्या तिकिटांवर पडण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
या महिन्याची सुरुवात थोड्याफार दिलासादायक बातमीने झाली आहे. आज, १ डिसेंबरपासून तेल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांनी कपात केली आहे. याआधी नोव्हेंबरमध्येही व्यावसायिक सिलिंडरचे दर ५ रुपयांनी कमी झाले होते. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस वापरणाऱ्यांचा खर्च हलका झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, ते दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
advertisement
3/6
सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एक महत्त्वाचा नियम आज, १ डिसेंबरपासून बदलला आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) निवडण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता ती मुदत पुढे वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे, ज्या कर्मचाऱ्यांनी एनपीएस (NPS) आणि यूपीएस (UPS) यापैकी कोणताही पर्याय निवडला नाही, त्यांना आता ही संधी मिळणार नाही.
advertisement
4/6
इंडिअन ऑईलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज १ डिसेंबर २०२५ पासून एटीएफ (ATF - Aviation Turbine Fuel) म्हणजेच हवाई इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये ही वाढ प्रति किलोलीटर ५१३३.७५ रुपये इतकी मोठी आहे. मुंबईतही एटीएफचे दर वाढले आहेत. इंधन महागल्यामुळे याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होणार आहे. साहजिकच, कंपन्या हा वाढलेला खर्च विमान तिकीटांच्या दरात वाढवून प्रवाशांकडून वसूल करण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
या महिन्यात बँक कर्मचाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण १७ दिवस बँकांमध्ये कामकाज बंद राहणार आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की, आरबीआयच्या नियमांनुसार या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे बँकेच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या राज्यातील बँकेची सुट्टी आहे की नाही, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आज, १ डिसेंबरला अरुणाचल प्रदेश आणि नागालँड वगळता इतर राज्यांत बँका सुरू आहेत, तर २५ डिसेंबरला मात्र देशभरात बँकांना सुट्टी असेल.
advertisement
6/6
या चार बदलांसोबतच एक दिलासादायक बातमी HSRP नंबर प्लेटबद्दल आहे. वाहनांसाठी ही नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 31 डिसेंबरपर्यंत नंबरप्लेट बसवून घेता येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आजपासून 4 मोठे बदल! गॅस स्वस्त, प्रवास महागला; १ डिसेंबरपासून बदलले नियम, तुमच्या खिशावर थेट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल