TRENDING:

मार्केटच्या क्लोजिंगनंतर परिस्थिती बदलली, उद्या ट्रेडिंगमध्ये मोठी उलथापालथ ठरलेली; गुंतवणूकदारांच्या मनात रात्रीच सुरू झाला गोंधळ

Last Updated:
Stocks To Watch: बाजार बंद झाल्यानंतर अशा काही कॉरपोरेट घडामोडी समोर आल्या आहेत, ज्या उद्या सकाळी ट्रेडिंग सुरू होताच मोठ्या हालचालीचे संकेत देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता 'टेन्शन' आणि 'उत्सुकता' दोन्ही वाढली आहे.
advertisement
1/13
शेअर बाजार बंद होताच परिस्थिती बदलली, उद्या ट्रेडिंगमध्ये मोठी उलथापालथ ठरलेली
शेअर बाजार बंद झाल्यानंतर समोर आलेल्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये हालचाल वाढली आहे. निकाल, न्यायालयीन निर्णय, गुंतवणूक योजना आणि बोर्ड मीटिंग्समुळे 20 जानेवारीला ट्रेडिंग सुरू होताच काही शेअर्समध्ये जोरदार हालचाल पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांसाठी आज हे स्टॉक्स विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहेत.
advertisement
2/13
Adani Power अदानी पॉवरला NCLAT (दिल्ली) मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडसाठी मांडलेल्या 4,000 कोटींच्या रिझोल्यूशन प्लॅनविरोधातील अपील फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे NCLT मुंबई बेंचचा निर्णय कायम राहिला आहे. हा निर्णय शेअरसाठी सकारात्मक मानला जात आहे.
advertisement
3/13
Tata Capital Q3 FY26 मध्ये टाटा कॅपिटलचा नेट प्रॉफिट तिमाही आधारावर 19.7% वाढून 790 कोटी रुपये झाला. NII मध्ये 44% वाढ होऊन तो 2,541 कोटी रुपये झाला आहे. मजबूत ऑपरेशनल कामगिरीमुळे शेअर फोकसमध्ये राहू शकतो.
advertisement
4/13
Oberoi Realty कंपनीचा Q3 कन्सोलिडेटेड नफा 618 कोटींवरून 623 कोटी रुपये झाला. उत्पन्न 1,411 कोटींवरून 1,493 कोटी रुपये झाले. EBITDA 856 कोटींवर स्थिर असला तरी EBITDA मार्जिन 60.7% वरून 57.4% वर घसरला.
advertisement
5/13
CEAT CEAT चे Q3 निकाल दमदार ठरले. नफा 97.1 कोटींवरून 155.7 कोटी रुपये झाला. उत्पन्न 3,299.9 कोटींवरून 4,157 कोटी रुपये झाले. EBITDA मार्जिन 10.3% वरून 13.5% पर्यंत वाढले.
advertisement
6/13
Amber Enterprises जेवर विमानतळाजवळ 100 एकर जमीन अँबर एंटरप्रायझेसला नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी मिळाली आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या सब्सिडियरीला 16 एकर जमीन वेगळी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये एकूण 6,785 कोटींची गुंतवणूक होणार आहे.
advertisement
7/13
Sai Silks (Kalamandir) Q3 FY26 मध्ये कंपनीचा नफा 17.4% घटून 38 कोटी रुपये झाला. महसूल 8.3% घसरून 411 कोटी रुपये राहिला. मागणी कमकुवत आणि खर्च वाढल्याने EBITDA मार्जिन 17% पर्यंत खाली आले.
advertisement
8/13
Deepak Nitrite कंपनीच्या सब्सिडियरीने गुजरातमधील भरूच येथे नायट्रोजन आणि दुसरा हायड्रोजन प्लांट सुरू केला आहे. यासाठी सुमारे 85 कोटींचा कॅपेक्स करण्यात आला आहे.
advertisement
9/13
Havells India डिसेंबर तिमाहीत हॅव्हेल्सची कामगिरी मिश्र राहिली. स्टँडअलोन नफा 301 कोटी रुपये, जो बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. मात्र वर्षभरात नफ्यात 6.4% वाढ झाली आहे. कंपनीने 4 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
advertisement
10/13
Genesis IBRC India कंपनीने पद्मनाबन कृष्णमूर्ती यांची अतिरिक्त नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. ते 19 जानेवारी 2026 पासून कंपनीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळतील.
advertisement
11/13
Bansal Wire Q3 मध्ये कंपनीचा नफा 41.6 कोटींवरून 43.2 कोटी रुपये झाला. उत्पन्न 924 कोटींवरून 1,029 कोटी रुपये झाले. EBITDA मार्जिन 7.7% वरून 8.3% झाले.
advertisement
12/13
Glenmark Pharma कंपनीची बोर्ड मीटिंग 30 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यात Q3 आणि 9 महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहेत.
advertisement
13/13
Deepak Fertilisers & Petrochemicals कंपनीची बोर्ड मीटिंग 29 जानेवारी 2026 रोजी होणार असून Q3 आर्थिक निकालांचा आढावा घेतला जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
मार्केटच्या क्लोजिंगनंतर परिस्थिती बदलली, उद्या ट्रेडिंगमध्ये मोठी उलथापालथ ठरलेली; गुंतवणूकदारांच्या मनात रात्रीच सुरू झाला गोंधळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल