TRENDING:

कोण म्हणतं 5 हजारात व्यवसाय यशस्वी होत नाही? ममता यांनी करून दाखवलं, आता महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:
ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलात व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी सुगंधी मेणबत्त्यांचा व्यवसाय केला आहे. यामधून दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई त्यांना होते.
advertisement
1/7
कोण म्हणतं 5 हजारात व्यवसाय यशस्वी होत नाही? ममता यांनी करून दाखवलं, आता महिन्याला 1 लाख कमाई
अनेक महिलांना सध्याच्या घडीला वाटते स्वतःचा व्यवसाय असावा. त्यामुळे बदलापूरच्या ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलात व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी सुगंधी मेणबत्त्यांचा व्यवसाय केला आहे. यामधून दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई त्यांना होते.
advertisement
2/7
ममता कांबळे यांनी 7K Candle या नावाने ब्रँड तयार केला आहे. त्यांच्या कँडल्स आणि रूम फ्रेशनर्सची देशभरातच नव्हे तर स्वित्झर्लंड, कॅनडा, अमेरिका मधूनही मोठी मागणी आहे.
advertisement
3/7
ममता कांबळे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एका खासगी बँकेत नोकरी करत होत्या. त्यांना नेहमीच स्वतःचं काहीतरी करावंसं वाटत होते. शेवटी त्यांनी नोकरीला रामराम ठोकत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला.
advertisement
4/7
घरूनच त्यांनी सुगंधी मेणबत्त्या तयार करण्यास सुरुवात केली. दर्जा आणि वेगळेपणावर भर दिल्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळू लागला.
advertisement
5/7
आज त्या विविध प्रकारच्या आकर्षक आणि दर्जेदार सुगंधी मेणबत्त्या, रूम फ्रेशनर्स बनवतात. या उत्पादनांची खासियत म्हणजे त्यातील सर्जनशील डिझाईन्स आहेत.
advertisement
6/7
यामध्ये मोदक, मोतीचूर लाडू, काजू कतली, विविध फुलांचे बुके, चहा-बिस्किटे, कॉफी अशा थीम्समध्ये तयार केलेले मेणबत्त्यांचे सेट आहेत. यामध्ये नैसर्गिक घटक आणि सुगंधी तेलांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे हे उत्पादन पर्यावरणपूरकही ठरते.
advertisement
7/7
या मेणबत्त्यांची घर, ऑफिस तसेच गिफ्टिंगसाठी मोठी मागणी आहे. सण-उत्सवांच्या काळात तर मागणी दुपटीने वाढते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
कोण म्हणतं 5 हजारात व्यवसाय यशस्वी होत नाही? ममता यांनी करून दाखवलं, आता महिन्याला 1 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल