Toll वर पैसे वाचवायचा नवा नियम, Fastag नसलं तरी नो टेन्शन, फक्त 'ही' एक गोष्ट हवीच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Toll Naka Rules Change : सरकारनं एक महत्त्वाचा बदल केला आहे, ज्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ही कार तसेच इतर वाहनचालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
advertisement
1/9

रस्त्यावरून प्रवास करताना टोल प्लाझावरची रांग आणि जादा वसुली यामुळे अनेकदा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्यांच्याकडे FASTag नाही, त्यांना टोलवर दुप्पट पैसे मोजावे लागत होते. काही जणांना तर FASTag असला तरी काही तांत्रिक अडचणींमुळे डबल पैसे भरावे लागत होते.
advertisement
2/9
पण आता सरकारनं एक महत्त्वाचा बदल केला आहे, ज्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ही कार तसेच इतर वाहनचालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
advertisement
3/9
त्यामुळे आता या नवीन नियमामुळे तुमच्याकडे प्रवास करताना FASTag नसला तरीही चालेल, पण तुमच्याकडे एक गोष्ट आवर्जून हवी ज्यामुळे तुम्हाला डबल पैसे भरावे लागणार नाहीत.
advertisement
4/9
काय आहे नवा नियम?केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि टोल प्लाझावर रोख व्यवहार कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे.
advertisement
5/9
या नियमांनुसार जर कोणी NON-FASTag वाहनधारकाने टोलवर रोख पैसे दिले तर त्याला टोलची दुप्पट रक्कम भरावी लागेल. मात्र, त्याच व्यक्तीने जर UPI किंवा इतर डिजिटल पेमेंट केले, तर टोल फक्त 1.25 पट आकारला जाईल. म्हणजेच, आता FASTag नसले तरी UPI ने पेमेंट केल्यास दुप्पट रक्कम द्यावी लागणार नाही.
advertisement
6/9
उदाहरणातून समजून घेऊजर एखाद्या वाहनाचा टोल 100 रुपये आहे आणि तुमच्याकडे FASTag नसेल तर जर तुम्ही कॅशने पैसे दिलेत, तर हा टोल तुम्हाला 200 रुपये, म्हणजे आधी प्रमाणेच भरावा लागेल. पण तुम्ही UPI ने पेमेंट केलंत, तर टोल होईल फक्त 125 रुपये असेल. याचा थेट फायदा असा की, FASTag नसतानाही UPI वापरल्यास तुम्ही 75 रुपयांची बचत करू शकता.
advertisement
7/9
यामुळे फक्त पैसेच वाचणार नाहीत, तर टोल प्लाझावरचा वेळही वाचेल. डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे रोख व्यवहार कमी होतील, पारदर्शकता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोलवरची लांबलचक रांग कमी होईल.
advertisement
8/9
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितलं की, हा बदल राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर टोल कलेक्शन अधिक वेगवान, सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यासाठी करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवास अधिक सोयीचा आणि जलद करण्याचं हे पाऊल मानलं जातं.
advertisement
9/9
हा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे त्या पूर्वी जर तुम्ही FASTag शिवाय प्रवास केला तर मात्र तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Toll वर पैसे वाचवायचा नवा नियम, Fastag नसलं तरी नो टेन्शन, फक्त 'ही' एक गोष्ट हवीच