TRENDING:

Post Officeची धमाकेदार स्कीम! दरमहा होईल 17 हजारांची कमाई, पण कशी?

Last Updated:
Post Office Best Scheme: आपले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतववावे अशी सर्वांची इच्छा असले. यासोबत त्यावर चांगलं रिटर्नही सर्वांना हवं असतं. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/9
Post Officeची धमाकेदार स्कीम! दरमहा होईल 17 हजारांची कमाई, पण कशी?
Post Office Best Scheme: आपल्यापैकी सर्वच लोक हे काहीना काही कमवत असतात. आपल्या कमाईतून आपणं थोडे पैसे सेव्ह करतो. आपण सेव्ह केलेले पैसे हे एखाद्या सुरक्षित ठिकावे राहावे आणि त्यातून आपल्याला चांगलं रिटर्न मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण लोकांना रिस्क नको असते. ज्यामुळे जिथे फिक्स रिटर्न मिळेल आणि कोणतीही जोखिम नसेल तेथे पैसे गुंतवणे भारतीयांना आवडते. यासाठी पोस्ट ऑफिसच्या स्किम्स खूप प्रसिद्ध आहेत.
advertisement
2/9
आपलै पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत आणि त्यातून योग्य रिटर्न मिळावं हे विशेषतः रियाटरमेंटनंतर खुप गरजेचं असतं. तुम्हालाही रिटायरमेंटनंतर गॅरंटीड मंथली इन्कम हवे असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्किम खूप फायदेशीर ठरते. ती स्किम म्हणजे पोस्ट ऑफि सीनियर सिटीझन सेव्हिंग स्किम आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दरमहा 17000 रुपयांहून जास्त कमाई केली जाऊ शकते.
advertisement
3/9
झिरो रिस्क असलेली जबरदस्त स्कीम : Post Office च्या लहान बचत योजनांवर ग्राहक विश्वास ठेवतात. कारण यामध्ये कोणतीच रिस्क नसते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची गॅरंटी स्वतः सरकार देत असते. आज आपण पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन स्किमविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये एफडीपेक्षा जास्त 8.2 टक्केचं व्याज ऑफर केलं जातंय.
advertisement
4/9
1000 रुपयांपासून सुरुवात, टॅक्स सूटही : पोस्ट ऑफिसच्या या स्किममध्ये गुंतवणुकीची सुरुवात फक्त 1000 रुपयांपासून केली जाऊ शकते. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट 30 लाख रुपये सेट करण्यात आली आहे. म्हणजेच एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुमचे रेग्युलर इन्कम सुरू होते आणि या व्यतिरिक्त यामध्ये केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीवर टॅक्स सूटही मिळते. आयकर अॅक्टच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक टॅक्स सूट मिळवली जाऊ शकते.
advertisement
5/9
गुंतवणुकीसाठी वयोमर्यादेत सूट : रियाटरमेंटनंतर फायनेंशियली फिट राहण्यासाठी ही पोस्ट ऑफिस स्कीम खुप फायदेशीर ठरू शकते. एज लिमिटविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे कोणतेही व्यक्ती पती-पत्नीसोबत जॉइंट अकाउंट ओपन करू शकता. तसंच काही खास प्रकरणांमध्ये सूट मिळवण्याची तरतूदही आहे. VRS घेणारे व्यक्तीचे वय अकाउंट ओपन करण्याच्या वेळी 55 वर्षांहून अधिक आणि 60 वर्षांपेक्षा कमी असू शकते. तसंच डिफेन्समध्ये रियायर्ड झालेले कर्मचारी 50 वर्षांहून अधिक आणि 60 वर्षांहून कमी वयात गुंतवणूक करू शकतात.
advertisement
6/9
या स्किमचा मॅच्योरिटी पीरियड 5 वर्षे : पोस्ट ऑफिस एससीएसएसमधील गुंतवणुकीचा मॅच्योरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे आणि खातेधारकाने संपूर्ण मॅच्योरिटी कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवल्यासच पूर्ण लाभ मिळू शकतो. या सरकारी योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुंतवणुकीवर व्याज दिले जाते. तसंच, अकाउंट होल्डरने या मुदतीपूर्वी अकाउंट बंद केले, तर नियमांनुसार त्यांना दंड आकारला जाईल. अकाउंटधारकाचा मॅच्योरिटी कालावधीपूर्वी मृत्यू झाला, तर अकाउंट बंद केले जाते आणि संपूर्ण रक्कम कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या नॉमिनीकडे ट्रान्सफर केली जाते.
advertisement
7/9
17 हजारांची कमाई कशी होईल? : सीनियर सिटिझन सेव्हिंग अकाउंट तुम्हीही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ओपन करू शकता. यामध्ये सिंगल अकाउंटपासून तर 15 लाख एकरकमी आणि जॉइंट अकाउंटवरुन 30 लाख रुपये कमाल गुंतवणूक केली जाऊ शकते.
advertisement
8/9
आपण दरमहा 17,000 रुपयांचे नियमित उत्पन्न गृहीत धरले, तर एखाद्या व्यक्तीने पोस्ट ऑफिस एससीएसएसमध्ये जॉइंट अकाउंटअंतर्गत 25 लाख रुपये गुंतवल्यास, त्याला तिमाही आधारावर केवळ व्याजातून 51250 रुपये मिळतील आणि हे संपूर्ण 5 वर्षे चालू राहील. हे तुम्ही मासिक उत्पन्न म्हणून गणना केली तर तुम्हाला दरमहा 17 हजार रुपये येतील. पाच वर्षांनंतर तुम्ही 30 लाख मूळ रक्कमही काढू शकता किंवा मग 3 वर्षांसाठी आणखी वाढवू शकता.
advertisement
9/9
हे लक्षात घेण्यासारखे आहे की एकदा तुम्ही गुंतवणूक केल्यावर, सरकारने तिमाही सुधारणेनुसार नंतर व्याजदर बदलले तरीही, तुमच्या मुदतपूर्ती कालावधीसाठी तोच व्याजदर लागू राहतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Post Officeची धमाकेदार स्कीम! दरमहा होईल 17 हजारांची कमाई, पण कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल