Share Market पेक्षा सुरक्षित आणि FD पेक्षा जास्त व्याजदर देतात 7 सरकारी स्कीम, तुमच्यासाठी कोणती बेस्ट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सुकन्या समृद्धी योजना ८.२०%, SCSS ८.२०%, RBI FRSB ८.०५%, NPS ८%, NSC ७.७०%, PPF ७.१०%, किसान विकास पत्र ७.५०% व्याजदर देतात. या योजना सुरक्षितता आणि चांगला परतावा देतात.
advertisement
1/8

आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी यासाठी आजही बहुतांश भारतीयांचा कल बँकेच्या मुदत ठेवींवर असतो. मात्र, सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात बँकांचे व्याजदर म्हणावे तसे आकर्षक राहिलेले नाहीत. अशा वेळी अनेक जण जास्त नफ्याच्या नादात शेअर मार्केट किंवा इतर जोखमीच्या ठिकाणी पैसे गुंतवतात. पण, सुरक्षितता आणि बंपर नफा यांचा मेळ घालणाऱ्या अशा काही सरकारी योजना आहेत, ज्या बँकेपेक्षाही जास्त परतावा देतात.
advertisement
2/8
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर ८.२०% - जर तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा फंड उभा करायचा असेल, तर यापेक्षा चांगला पर्याय नाही. सध्या यात सर्वाधिक ८.२०% व्याज मिळत असून, गुंतवणुकीवर टॅक्समध्येही सूट मिळते.
advertisement
3/8
SCSS व्याजदर ८.२०%- निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा शोध घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे जणू वरदानच आहे. बँकेच्या साध्या एफडीपेक्षा यात जास्त परतावा मिळतो आणि व्याजाचे पैसे दर तीन महिन्यांनी खात्यात जमा होतात.
advertisement
4/8
RBI FRSB व्याजदर ८.०५%- बँकेसारखीच १००% सुरक्षा आणि नफा मात्र जास्त! हे बाँड्स तुम्ही 'RBI Retail' ॲपवरून खरेदी करू शकता. याचा व्याजदर वेळोवेळी बदलत असला तरी तो सध्या ८.०५% च्या आसपास असून एफडीपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे.
advertisement
5/8
NPS सुमारे ८% परतावा- रिटायरमेंटनंतर पेन्शनचा आधार हवा असेल, तर NPS हा उत्तम पर्याय आहे. यात तुमचे पैसे मार्केटमध्ये गुंतवले जात असल्याने दीर्घकाळात ८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. याशिवाय, ८० सी अंतर्गत दीड लाखांव्यतिरिक्त ५० हजारांची वेगळी टॅक्स सूट मिळते.
advertisement
6/8
NSC व्याजदर ७.७०%- जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट हा एक सुरक्षित मार्ग आहे. यात ७.७०% दराने चक्रवाढ व्याज मिळते. विशेष म्हणजे, तुम्ही फक्त १,००० रुपयांपासूनही यात सुरुवात करू शकता.
advertisement
7/8
PPF व्याजदर ७.१०%- दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा आजही भारतीयांचा आवडता पर्याय आहे. यात मिळणारे ७.१०% व्याज हे पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असते. १५ वर्षांच्या या योजनेत चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून मोठा निधी जमा होतो.
advertisement
8/8
किसान विकास पत्र व्याजदर ७.५०% - तुमची गुंतवणूक केलेली रक्कम एका ठराविक काळात दुप्पट करायची असेल, तर ही योजना लोकप्रिय आहे. सध्याच्या ७.५०% व्याजदरामुळे तुमची रक्कम ११५ महिन्यांत (९ वर्षे ७ महिने) दुप्पट होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Share Market पेक्षा सुरक्षित आणि FD पेक्षा जास्त व्याजदर देतात 7 सरकारी स्कीम, तुमच्यासाठी कोणती बेस्ट?