US-व्हेनेझुएला संघर्षाचा थेट परिणाम; चांदी रॉकेटपेक्षा वेगवान, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चांदीच्या किमतींनी विक्रमी झेप घेतली असून मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्ये दर २.५३ ते २.७१ लाखांवर पोहोचले. रशिया-युक्रेन वाद आणि कमी पुरवठ्यामुळे वाढ कायम.
advertisement
1/6

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात जी वाढ होत आहे, तिने आता सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांदीने असा काही 'धडाका' लावला आहे की, किंमत थेट अडीच लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. अवघ्या ७ दिवसांत चांदीच्या भावात तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाली असून, खरेदी करायला गेलेल्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
advertisement
2/6
१ जानेवारीला जी चांदी २.२९ लाख रुपयांना मिळत होती, तिने अवघ्या सहा दिवसांत मोठी झेप घेतली. काल ६ जानेवारीला भाव २.४३ लाखांवर होता आणि आज तो २.५७ लाखांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच आठवडाभरापूर्वी चांदी खरेदी केली असती, तर आज ती कित्येक पटीने महाग झाली आहे.
advertisement
3/6
मुंबई आणि दिल्लीमध्ये २,५३,१०० रुपये प्रति किलो तर चेन्नई: २,७१,१०० रुपये प्रति किलोवर दर पोहोचले आहेत. येत्या काळात हे दर 3 लाखांहून अधिक जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना प्रश्न पडतोय की अचानक हे भाव का वाढले?
advertisement
4/6
रशिया-युक्रेन आणि अमेरिका-वेनेझुएला यांच्यातील वादामुळे जगात भीतीचे वातावरण आहे. जेव्हा जगात संकट येते, तेव्हा मोठे गुंतवणूकदार पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चांदी खरेदी करतात. कारखाने आणि उद्योगांमध्ये चांदीचा वापर वाढला आहे, पण त्या तुलनेत चांदीचा पुरवठा कमी पडत आहे.
advertisement
5/6
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीने आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड (८२.५८ डॉलर) केला आहे, त्याचा फटका आपल्या खिशाला बसत आहे. ज्यांनी १ लाख रुपये चांदी असताना गुंतवणूक केली त्यांना आता मोठा फायदा होत आहे.
advertisement
6/6
ज्यांनी आधी चांदी घेऊन ठेवली होती, त्यांचे तर आता नशीब उजळले आहे. मात्र, लग्नसराईसाठी किंवा दागिन्यांसाठी चांदी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, चांदीचे भाव तूर्तास तरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
US-व्हेनेझुएला संघर्षाचा थेट परिणाम; चांदी रॉकेटपेक्षा वेगवान, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले