100000 रुपयांनी घसरले चांदीचे दर, सोनंही गडागडा आपटलं, पैसे गुंतवलेल्यांना मोठा फटका
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सोन्या चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना सराफा बाराजात मोठा भुकंत पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव अचानक खुप खाली आला आहे. पाहूया काय सुरु आहेत सोन्या चांदीचे भाव...
advertisement
1/7

सोन्या-चांदीच्या वाढत्या किंमती या मोठ-मोठे विक्रम स्थापित करत आहेत. दरम्यान सराफा बाराजात मोठा भूकंप पाहायला मिळाला. चांदीचा भाव अचानक अत्यंत खाली आलाय. तर सोनंही तोंडावर आपटलंय.
advertisement
2/7
ही मोठी घसरण फक्त वायदे बाजारामध्ये झालेली नाही. तर स्थानिक बाजारामध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एक्सपर्टने सांगितल्या प्रमाणे विक्रमी किंमती गाठलेल्या सोन्या चांदीचे दर ही घसरण्याची शक्यता होती. आता या शक्यतेनंतरच ही घसरण पाहायला मिळत आहे. सोनं घरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण खुप मोठा दिलासा आहे.
advertisement
3/7
चांदीचा दर लवकरच कमी होणार असं एक्सपर्ट्स सांगत होतं. अगदी तसंच झालं आहे. फक्त एका दिवसामध्ये चांदीचा दर हा तब्बल 1 लाखांनी कमी झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवाची चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. यानंतर चांदीचा दर हा 3 लाख 99 हजार 893 रुपयांपर्यंत पोहोचली होती.
advertisement
4/7
दरम्यान शुक्रवारी वायदा बाजार बंद झाला. यानंतर 5 मार्चची एक्सपायरी असलेल्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. वेगाने हा दर खाली आला आणि चांदी प्रति किलो 2 लाख 91 हजार 922 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एका झटक्यामध्ये चांदीचा दर हा प्रति किलो 1 लाख 07 हजार 971 रुपयांनी कमी झाला आहे.
advertisement
5/7
गुरुवारी चांदीच्या दराने सर्व ऐतिहासिक विक्रम मोडले होते. तर चांदी पहिल्यांदाच प्रति किलो 4 लाखांच्या पार पोहोचली होती. मात्र या मोठ्या वाढीनंतर चांदी अचानक खाली कोसळली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना यामध्ये मोठा धक्का बसला आहे.
advertisement
6/7
फक्त चांदीच्या किंमतीमध्येच घसरण झालेली नाही. तर सोन्यानेही गटांगळ्या खाल्ल्या आहेत. एका झटक्यात सोनं घसरलं आहे. 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याच्या किंमती या फक्त एका दिवसामध्ये 33 हजार 113 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
advertisement
7/7
एमसीएक्सवर 2 एप्रिल रोजीची एक्सपायरी डेट असणाऱ्या सोन्याचे वायदे भाव हे गुरुवारी 1 लाख 83 हजार 962 रुपये प्रति 10 ग्राम होते. शुक्रवारी या किंमतीत घट झाली आहे. या किंमतीत 10 ग्राम सोन्याचे दर 1 लाख 50 हजार 849 रुपयांपर्यंत खाली आहे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
100000 रुपयांनी घसरले चांदीचे दर, सोनंही गडागडा आपटलं, पैसे गुंतवलेल्यांना मोठा फटका