TRENDING:

LPG सिलेंडरमध्ये 14.2 किलोच गॅस का? पूर्ण 14 किंवा 15kg का नाही? 99% लोकांना माहितीच नाही

Last Updated:
सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरची चर्चा सुरू आहे. अनेक लोक हे गॅस तुटवड्याच्या भितीने एक्स्ट्राचे गॅस सिलिंडर भरून ठेवत आहेत. दरम्यान आज आपण गॅस सिलिंडरच्या काही फॅक्ट्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/10
LPG सिलेंडरमध्ये 14.2 किलोच गॅस का? पूर्ण 14 किंवा 15kg का नाही? 99% लोकांना माहितीच नाही
आखाती देशांमधील युद्धामुळे भारतात एलपीजीच्या तुटवड्याच्या चर्चा सुरू आहेत. गॅस सिलेंडर संपण्याच्या भितीने लोक गॅस एजेंसीसमोर रांगा लावत आहेत. असं असताना आपण वारंवार टीव्हीमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आणि विविध ठिकाणी वाचतोय की, घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. पण यात एवढाच गॅस का असतो. तो पूर्ण 14 किंवा 15 किलो का भरला जात नाही. हे थोटं विचित्र वाटतंय ना? या मागेही एक महत्त्वाचं कारण आहे.
advertisement
2/10
14.2 किलो वजन ठेवण्यामागे काहीच रुल नव्हता. तर हा निर्णय खुप विचारपूर्वक घेतला गेला होता. जेणेकरुन सर्वसामान्य लोकांना सिलेंडरचा वापर करणे सोपे व्हावे. खिशावर ओझं पडू नये आणि सुरक्षाही पूर्ण राहावी. कालांतराने, हे प्रमाण इतके अचूक झाले की ते एक स्टँडर्ड बनले आणि आपण आजही त्याचे पालन करतो.
advertisement
3/10
भारतात घरुगुती LPG चं चलन 1950 च्या दशकाच्या अखेरपासून सुरू झालं. या दरम्यान बर्मा शेल नावाच्या एका विदेशी कंपनी गॅसचा पुरवठा करायची. याकंपनीने सर्वात आधी सिलेंडरचा हा खास आकार आणि वजन ठरवला होता. यानंतर हीच कंपनी चेंज हेऊन भारत पेट्रोलियम बनली. मात्र त्यांनी ठरवलेली सिलेंडरची साइज आजही तिच आहे.
advertisement
4/10
बर्मा शेल कंपनीने त्या काळात तीन मोठ्या गोष्टीं लक्षात ठेवून हा 14.2 किलोचा आकडा निवडला होता. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट उचलण्यास सोपं जावं. सिलेंडरमध्ये 14.2 किलो गॅस भरला जातो, तेव्हा रिकाम्या लोखंडी टाकीसह त्याचे एकूण वजन सुमारे 29 ते 30 किलो होते. त्यावेळच्या एका सर्व्हेनुसार, एक सामान्य भारतीय व्यक्ती एवढे वजन सहजपणे उचलू आणि ठेवू शकत होती. वजन 30 किलोपेक्षा जास्त असते, तर सिलेंडर हलवणे थोडे कठीण झाले असते.
advertisement
5/10
दुसरे मोठे कारण - एका कुटुंबाच्या गरजेचा अंदाज. त्यावेळी एक्सपर्ट्सने हिशोब लावला की, दरमहा एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी किती गॅस वापरला जातो. रिसर्चमध्ये समोर आले की, 14 किलोच्या आसपास गॅस लागतो. हा गॅस 30-45 दिवस सहज टिकतो. म्हणजेच एकदा सिलेंडर आल्यावर महिनाभर नो टेन्शन.
advertisement
6/10
या हिशोबाने ग्राहकांसाठी सोपं झालं. त्यांना दरमहिन्याला किंवा दिडमहिन्याला सिलेंडर आणाव लागत होतं. सोबतच गॅस कंपन्यांसाठीही डिलिव्हरीचं काम सोपं झालं. कारण त्यांना कळलं की, घरी किती दिवसांनंतर सिलेंडरची गरज पडेल. ही पुरवठ्याची पद्धत यशस्वी ठरली आणि हेच मॉडल आज अनेक दशकांपासून पूर्णपणे फीट बसतंय.
advertisement
7/10
तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण हे टेक्निकल होते. ते सुरक्षितता आणि सिलेंडरच्या मजबुतीशी संबंधित होते. आपल्याला माहित आहे की एलपीजी सिलेंडरमध्ये खूप जास्त दाबाखाली गॅस भरला जातो. हा दाब सहन करण्यासाठी, लोखंडी टँकच्या भिंती एका विशिष्ट जाडीच्या तयार केलेल्या असतात. जर 14.2किलोपेक्षा जास्त गॅस भरण्याचा प्रयत्न केला गेला, तर सिलेंडरचा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला असता किंवा तो खूपच जाड आणि जड बनवावा लागला असता.
advertisement
8/10
सिलेंडर आणखी मजबूत आणि जड बनवला गेला असता तर तो बनवण्याचा खर्च वाढला असता आणि तो घरापर्यंत पोहोचवणेही कठीण झालं असतं. त्या वेळी इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने 14.2 किलो ही सर्वात सुरक्षित प्रमाण होते. जे सहज मॅनेज केले जाऊ शकत होते. यामध्ये सुरक्षा आणि बचतीचं सुयोग्य बॅलेन्स होते.
advertisement
9/10
आपण आणखी सखोलपणे समजून घेतल्यास, एलपीजी हा एकच गॅस नाही. खरंतर दोन गॅसो प्रोपेन आणि ब्यूटेनचे मिश्रण आहे. या दोन्ही गॅसचं वजन आणि घनत्व वेगवेगळे असते. हवामानानुसार त्यांचे प्रमाणही थोडे बदलते, जेणेकरुन वायूचा प्रेशर स्थिर राहतो.
advertisement
10/10
त्या काळातील इंजीनियरर्सने सिलेंडरच्या आतील रिकामी जागा, गॅस पसरण्याची क्षमता आणि दबाव सहन करण्याची ताकद लक्षात घेऊन कॅलक्युलेशन केले. तेव्हा त्यांना मिळालेला सर्वात अचूक आणि सुरक्षित आकडा 14.2 किलोग्राम हा होता. आता तुम्हाला कळाले असेल की, हा फक्त नंबर किंवा योगायोग नाही. तर अनेक वर्षांपूर्वीची इंजीनियरिंग, गणित आणि आपल्या सोयीसाठी गरजेचे होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG सिलेंडरमध्ये 14.2 किलोच गॅस का? पूर्ण 14 किंवा 15kg का नाही? 99% लोकांना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल