चेकवर 'Only' का लिहावं लागतं? ते जर नाही लिहिलं तर काय होईल? बँकेचा नियम वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एखाद्याला चेक देणं म्हणजे काय? तर आपण आपल्या बँकेला सांगतो की "ही ठराविक रक्कम या व्यक्तीला द्या". उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मित्राला ₹5000 देणार असाल, तर तुम्ही चेकवर त्या रकमेची नोंद करून ती रक्कम बँकेला सांगता की ते पैसे त्याला द्यावेत.
advertisement
1/10

आपण सगळे बँकेत पैसे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी चेकचा वापर करतो. चेकचा वापर लोकांमध्ये आता सामान्य झाला आहे. तसे पाहाता आता लोक ऑनलाइन व्यवहार करतात. पण असं असलं तरी देखील आजही चेकचा वापर सेफ मानला जातो.
advertisement
2/10
एखाद्याला चेक देणं म्हणजे काय? तर आपण आपल्या बँकेला सांगतो की "ही ठराविक रक्कम या व्यक्तीला द्या". उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मित्राला ₹5000 देणार असाल, तर तुम्ही चेकवर त्या रकमेची नोंद करून ती रक्कम बँकेला सांगता की ते पैसे त्याला द्यावेत.
advertisement
3/10
भारतात चेकसंबंधी नियम “Negotiable Instruments Act, 1881” या कायद्यांतर्गत येतात आणि बँकिंग पद्धती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालतात. त्यामुळे चेक भरताना थोडी काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते, कारण एका छोट्या चुकीमुळे मोठा त्रास होऊ शकतो.
advertisement
4/10
“Only” शब्द लिहिण्याचं कारण काय?तुम्ही पाहिलं असेल, चेकवर रक्कम शब्दात लिहिल्यानंतर शेवटी “Only” हा शब्द लिहिला जातो. जसं की“Rupees Five Thousand Only” आता हा “Only” शब्द का लिहितात हे तु्म्हाला माहितीय का? चला जाणून घेऊ
advertisement
5/10
1. फसवणूक टाळण्यासाठीसगळ्यात मोठं कारण म्हणजे फसवणूक टाळणं. समजा तुम्ही फक्त “Rupees Five Thousand” असं लिहिलं, तर कुणी तरी नंतर “Nine Hundred” किंवा “Fifty” असं पुढे जोडून रक्कम वाढवू शकतो. अशावेळी ₹5000 ऐवजी ₹5900 चा चेक होईल. पण जर तेच तुम्ही “Only” लिहिल्याने हे शक्य होत नाही, कारण शब्द संपल्याचं संकेत मिळतो.
advertisement
6/10
2. स्पष्टता राहते“Only” लिहिल्याने बँकेलाही समजतं की हीच खरी रक्कम आहे आणि त्यापलीकडे काही नाही. त्यामुळे चेकची प्रक्रिया करताना कोणताही गोंधळ राहत नाही.
advertisement
7/10
3. बँकेची सवय आणि मार्गदर्शनखूप बँका त्यांच्या मार्गदर्शक पुस्तकांमध्ये सांगतात की रक्कम शब्दात लिहिताना “Only” लिहावं. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही खात्री राहते की चेक योग्य आहे.
advertisement
8/10
“Only” न लिहिल्यास काय होईल?खूप लोकांचा प्रश्न असतो की “Only” न लिहिलं तर चेक चालणार नाही का? पण असं नाही, ते न लिहिलात देखील चेक चालेल, पण यामुळे धोका थोडा वाढतो. चेक रद्द होत नाही, पण बँक काही वेळा अधिक तपासणी करू शकते.
advertisement
9/10
रक्कम आकड्यात लिहिताना शेवटी “/-” लिहा. उदाहरणार्थ: ₹5000/-यामुळे पुढे अंक जोडणे कठीण होतं. चुक झाली तर चेकवर खोडाखोड करू नका. नवा चेक वापरा.
advertisement
10/10
चेकवर “Only” लिहिणं हे काही औपचारिकता नाही, तर एक महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. हा छोटासा शब्द तुमचं हजारो रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे पुढच्यावेळी चेक लिहिताना “Only” लिहायचं विसरू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
चेकवर 'Only' का लिहावं लागतं? ते जर नाही लिहिलं तर काय होईल? बँकेचा नियम वाचा