TRENDING:

Electricity : तुम्ही देखील वीजबिल ऑनलाइन भरता का? मग आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठं नुकसान

Last Updated:
पूर्वी वीजबिल भरण्यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं, पण आता घरबसल्या मोबाईलवरून बिल भरता येतं. काही वीज कंपन्या ग्राहकांना बिलाचे मेसेजही पाठवतात.
advertisement
1/6
तुम्ही देखील वीजबिल ऑनलाइन भरता का? मग आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठं नुकसान
आजकाल बहुतेक सर्व सरकारी आणि खासगी सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मोबाईलवर काही क्लिकमध्ये आपण बँकिंगपासून वीजबिलापर्यंत सगळं काही करू शकतो. त्यामुळे लोकांचं काम खरंच सोपं झालं आहे आणि वेळही वाचतो. पण या सोयीबरोबरच काही धोकेही वाढले आहेत. विशेषतः ऑनलाइन फसवणुकीचे. अलीकडेच अशा फसवणुकीत अनेक लोकांचे पैसे गमावले गेले आहेत आणि यावेळी टार्गेट बनले आहेत वीजबिल भरणारे ग्राहक.
advertisement
2/6
पूर्वी वीजबिल भरण्यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं, पण आता घरबसल्या मोबाईलवरून बिल भरता येतं. काही वीज कंपन्या ग्राहकांना बिलाचे मेसेजही पाठवतात. पण लक्षात ठेवा प्रत्येक मेसेज कंपनीकडून आलेला असेलच असं नाही. काही फसवणूक करणारे खोट्या लिंक पाठवून लोकांची दिशाभूल करत आहेत.
advertisement
3/6
अलीकडच्या घटनेत एका ग्राहकाला “तुमचं लाईट बिल भरलेलं नाही, लिंकवर क्लिक करून तत्काळ भरा, नाहीतर वीज कनेक्शन कट होईल” असा मेसेज आला. घाईघाईत त्या व्यक्तीने त्या लिंकवरून पैसे भरले, पण नंतर लक्षात आलं की ती लिंक बनावट होती. बिल भरलं गेलं नाही आणि त्याचे पैसे गेले.
advertisement
4/6
अशा प्रकारचे प्रकार पुन्हा वाढताना दिसत आहेत. मोबाईलवरून आलेल्या फसव्या लिंकवर क्लिक केल्यावर स्कॅमर लोक ग्राहकांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
5/6
वीज वितरण विभागाचा नागरिकांना इशाराकोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.“वीज कनेक्शन कट होईल” असे मेसेज आल्यास घाबरून पैसे भरू नका.बिल भरण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत मोबाइल अ‍ॅप वापरा.
advertisement
6/6
कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप, एजंट किंवा दुकानातून बिल भरू नका.तुमचा मोबाईल नंबर फक्त अधिकृत वेबसाइटवरच नोंदवा.शंका असल्यास टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Electricity : तुम्ही देखील वीजबिल ऑनलाइन भरता का? मग आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल