TRENDING:

High Court Job: नोकरीची सुवर्णसंधी, मुंबई उच्च न्यायालयात भरती! अर्ज कसा करावा?

Last Updated:
High Court Recruitment 2026 : मुंबई उच्च न्यायालयाने भरती जाहीर केली आहे. सिस्टम ऑफिसर आणि सिनियर सिस्टम ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
1/4
नोकरीची सुवर्णसंधी, मुंबई उच्च न्यायालयात भरती! अर्ज कसा करावा?
सिस्टम ऑफिसर पदासाठी 5 वर्षांचा तर सिनियर सिस्टम ऑफिसर पदासाठी 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरभरती होत असून तुमच्या जिल्ह्यात किती जागांवर भरती होणार आहे, याची माहित तुम्हाला जाहिरातीच्या PDF मध्ये मिळेल. अर्जासोबतच कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि फॅमिली डिक्लेरेशन फॉर्म भरून देणं सुद्धा आवश्यक असणार आहेत. जर उमेदवार सर्वच गोष्टींमध्ये बसत असेल, तर तात्काळ अर्ज भरून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत.
advertisement
2/4
नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून सुद्धा अर्ज भरला नसेल तर, तात्काळ भरा. 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सर्व माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.
advertisement
3/4
अर्ज भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे अर्ज तुम्ही विनाशुल्क भरू शकणार आहेत. म्हणजेच, अर्जाचे शुल्क संपूर्णपणे फ्री आहे. 29 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचे 40 वर्षे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील अर्जदारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. इतरत्र प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिलेली नाही.
advertisement
4/4
सिस्टम ऑफिसर पदासाठी 54 जागांवर भरती केली जाणार असून सिनियर सिस्टम ऑफिसर पदासाठी 29 जागांवर भरती केली जाणार आहे. या दोन्हीही पदांसाठी B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA ची डिग्री आवश्य आहे. नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर)/ RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
High Court Job: नोकरीची सुवर्णसंधी, मुंबई उच्च न्यायालयात भरती! अर्ज कसा करावा?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल