कपाशीच्या दरात किंचित वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 6 हजार 497 क्विंटल इतकी झाली. 2 हजार क्विंटल सर्वाधिक आवक वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीत कमी 7700 तर जास्तीत जास्त 8355 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रावर आता नवीन संकट, पुन्हा येतेय लाट, हवामान खात्याचा अलर्ट
कांद्याचे दर स्थिर
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 1 लाख 48 हजार 078 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 48 हजार 024 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 481 ते जास्तीत जास्त 1620 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या लाल कांद्याला सर्वाधिक 2700 रुपये बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेला कांद्याचा दर आज स्थिर आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 27 हजार 060 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 4 हजार 433 क्विंटल सर्वाधिक आवक अकोला मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4550 ते जास्तीत जास्त 5268 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या पिवळ्या सोयाबिनला 5910 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.
तुरीच्या दरात घट
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 13 हजार 862 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 5 हजार 957 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 6734 ते 7625 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आलेल्या तुरीला 7828 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात घट झाली आहे.





