TRENDING:

Mumbai Metro: मुंबई आणि पुण्यात आता मेट्रोचं जाळं वाढणार, हे असणार आहे नवे मार्ग, संपूर्ण यादी

Last Updated:
मेट्रोचे फक्त मुंबईतच नाही तर, आता नवी मुंबई, पुणे या शहरातही जाळे झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारने आणखी नव्या मेट्रो प्रकल्पासाठी निविदा जाहीर करत नोकरदारांना दिलासा दिला आहे.
advertisement
1/8
मुंबई आणि पुण्यात आता मेट्रोचं जाळं वाढणार, हे असणार आहे नवे मार्ग, संपूर्ण यादी
मेट्रोच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विणलं जात आहे. हे मेट्रोचं जाळं प्रत्येक मेट्रो मार्गाला जोडण्याचं काम सध्या महाराष्ट्र सरकारकडून केलं जात आहे. सध्या अनेक मेट्रो मार्गांचे उद्घाटन बाकी असताना अशातच मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मेट्रो मार्गांची घोषणा करत निविदा जाहीर केली आहे.
advertisement
2/8
मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नवी मुंबई आणि पुणे अशा तिनही महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांची घोषणा केली आहे. नोकरदारांना समोर ठेवून मेट्रोच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यातील काही मेट्रो मार्गिकेच्या आधीच घोषणा केल्या होत्या. आता त्या मार्गिकेच्या निविदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत.
advertisement
3/8
मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये तब्बल 490 किमीचे मेट्रोचे जाळे उभारले गेले आहे. त्यापैकी एकूण 173 किमीच्या मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी उर्वरित मार्गिकेचे काम प्रगती पथावर असून लवकरात लवकर सर्व मार्गांचे काम आटोपले जाणार आहे.
advertisement
4/8
चालू वर्षात 50 किमीचा मार्ग सुरू करण्याचा मानस असून 2029 पर्यंत 165 किमीचा मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. ठाणे आणि मुंबईतील काही मार्गांचे सध्या उद्धाटन बाकी आहेत. त्यांचे केव्हापर्यंत उद्धाटन होणार? याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.
advertisement
5/8
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी मेट्रो 11 ची घोषणा केली होती. जी संपूर्ण भूमिगत असणार आहे. याची आता मुख्यमंत्र्यांकडून निविदा जाहीर करण्यात आलेली आहे. वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मार्गासाठी 23, 487 कोटींपर्यंतचा खर्च जाहीर केला आहे. पुढे हाच मार्ग धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत जोडण्याचे नियोजन आहे.
advertisement
6/8
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडणाऱ्या मुंबई मेट्रो 8 मार्गिकेसाठी 22,862 कोटींच्या खर्चाची निविदा जाहीर केली आहे. यामुळे प्रवाशांना दोन्हीही विमानतळावरील प्रवास अधिकच सुखकर होईल.
advertisement
7/8
नवी मुंबईकरांनाही मेट्रोचं गिफ्ट राज्य सरकारने दिलं आहे. तळोजा ते खांदेश्वर मार्गावरील मेट्रोची घोषणा करण्यात आली असून या मार्गासाठी 5575 कोटींचा खर्च जाहीर केला आहे. नवी मुंबईमध्ये नागरिकांची रेलचेल दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्या अनुषंगाने मेट्रो मार्गिकेची घोषणा केली.
advertisement
8/8
पुण्यातीलही अनेक मेट्रो मार्गिकेंना राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी मार्गावर हडपसर ते लोणी- काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड अशा दोन मार्गिकेंना मान्यता देण्यात आली. शिवाय, रामवाडी ते वाघोली या 11 किमीच्या प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Metro: मुंबई आणि पुण्यात आता मेट्रोचं जाळं वाढणार, हे असणार आहे नवे मार्ग, संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल