TRENDING:

Abhishek Ghosalkar : 'व्हॅलेंटाइन डे'ला लग्नाचा वाढदिवस, 4 दिवस आधी घात; मैत्रीचा हात पुढे करून झाली हत्या

Last Updated:
मॉरिसने गोळीबारानंतर बाहेर येत आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेंगा असं ओरडून सांगितलं. त्यावेळी त्याच्या हातात रिव्हॉल्वर होती अशी माहिती समोर आलीय.
advertisement
1/8
'व्हॅलेंटाइन डे'ला लग्नाचा वाढदिवस, 4 दिवस आधी घात; मैत्रीचा हात पुढे करून हत्या
दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना याच्यासोबतचे वाद मिटवून पुढे एकत्र काम करण्याचं ठरवल्याचं फेसबुक लाइव्हमध्येही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं होतं.
advertisement
2/8
फेसबुक लाइव्ह संपवून बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी ते उठताच मॉरिस नरोनाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
3/8
मॉरिस नरोना हा मॉरिस भाई नावाने ओळखला जात होता. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घातल्यानंतर मॉरिस त्याच्या कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर हातातली रिव्हॉल्वर उंचावर आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नही जायेगा असं ओरडला.
advertisement
4/8
अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र होते. ते शिवसेनेचे माजी नगरसेवकसुद्धा होते. सध्या त्यांच्या पत्नी तेजस्वी या नगरसेवक आहेत.
advertisement
5/8
अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी यांचा १४ फेब्रुवारीला लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस ते मनाली इथं साजरा करणार होते. मात्र त्याआधीच मॉरिसने त्यांची हत्या केली.
advertisement
6/8
मॉरिसने गोळीबारानंतर बाहेर येत आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेंगा असं ओरडून सांगितलं. त्यावेळी त्याच्या हातात रिव्हॉल्वर होती अशी माहिती समोर आलीय.
advertisement
7/8
तेजस्वी घोसाळकर यांनी कांदारपाडा, दहीसर इथं हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे फोटो अभिषेक घोसाळकर यांनी शेअर केले होते.
advertisement
8/8
तेजस्वी घोसाळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. तिथून ते मॉरिसने बोलावल्याने त्याच्या कार्यालयात आले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Abhishek Ghosalkar : 'व्हॅलेंटाइन डे'ला लग्नाचा वाढदिवस, 4 दिवस आधी घात; मैत्रीचा हात पुढे करून झाली हत्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल