Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेची लाट असतानाच हवामानाचं नवं संकट आलं आहे. 14 मार्चला 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
advertisement
1/7

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून काही जिल्ह्यांत पारा चाळिशी पार गेला. आता मात्र, हवामानात मोठे बदल जाणवत असून राज्यावर अस्मानी संकट घोंघावत आहे. आज, शनिवारी मुंबईसह चार जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असेल. 14 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
राज्यात हवापालट झाल्याचे चित्र असले तरी कोकणात उष्णतेचा जोर कायम आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना आज पुन्हा उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासानंतर या भागात देखील हवामान कोरडे राहील. तापमान 31 ते 34 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवत आहे. काही जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि सोलापुरात वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. हवामान विभागाने या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह इतर जिल्ह्यांत उन्हाचे चटके कायम आहेत. आज हवामान कोरडे राहील. मात्र 24 तासांत हवामानात बदलांची शक्यता असून 15 मार्चला नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगावला हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 37-40 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील उष्णतेची लाट ओसरली असून आता अस्मानी संकट घोंघावत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात कोरडे हवामान कायम आहे. तर बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यात हलका पाऊस होईल. कमाल तापमान 36 ते 39 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
विदर्भात उन्हाचे चटके जाणवत असतानाच आकाशात ढग दाटले आहेत. आज गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर नागपूरसह काही जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला नाही. परंतु, 15 मार्चपासून संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. कमाल तापमान 38 ते 41 अंशांच्या दरम्यान कायम राहील.
advertisement
7/7
दरम्यान, महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस तर 4 जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असेल. 24 तासानंतर राज्यातील अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची तर शेतकऱ्यांना शेतीपिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट