TRENDING:

Weather Alert: नोव्हेंबर अखेर सूर्याला ताप, कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातील आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबर अखेर कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई-ठाणेकरांना देखील ऐन थंडीत उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
advertisement
1/5
नोव्हेंबरअखेर सूर्याला ताप, कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातील आजचं हवामान अपडेट
कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांत जाणवत असलेली थंडी आता आणखी कमी झालेली दिसते. सकाळच्या वेळी पूर्वीसारखी गार हवा राहिलेली नाही, उलट वातावरणात उकाडा जाणवतोय. दिवसा तापमानात 1–2 अंशांनी वाढ होत असून कोणत्याही भागात तापमान घसरल्याचं दिसत नाही. हवा कोरडी असून मुंबईसह कोकणातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज पुन्हा उष्णता वाढलेली राहणार आहे. किमान तापमान 22°C असून कालच्या तुलनेत यात घट नाही, तर दिवसा कमाल तापमान 33–34°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे तापमानात हलकी वाढ जाणवते. सकाळ-संध्याकाळचा गारवा कमी झाल्याने मुंबईत दिवसभर उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणीही तापमानाचा कल वाढीकडेच आहे. किमान तापमान 21–22°C असून यात कालच्या तुलनेत फारसा फरक नाही. परंतु कमाल तापमान 33–34°C दरम्यान राहत असून ते कालपेक्षा 1°C ने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत थंडी कमी होत असून उकाडा वाढतोय
advertisement
4/5
पालघरमध्येही हवामान जवळपास याच पद्धतीने राहणार आहे. किमान तापमान 20–21°C, जे कालपेक्षा किंचितच जास्त आहे. कमाल तापमान 32–33°C च्या आसपास राहील. या जिल्ह्यातही तापमानात घट दिसत नाही, उलट दिवसा उष्णतेत थोडी वाढ जाणवेल.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्येही तापमान वाढतेच आहे. किमान तापमान 21–22°C असून यात घट झालेली नाही, तर कमाल तापमान 32–33°C पर्यंत जाईल. समुद्रकिनारी सकाळचा हलका गारवा सोडला तर उरलेला दिवस स्पष्टपणे उष्णतेकडे झुकलेला राहणार आहे. म्हणजेच दक्षिण कोकणातही तापमानात कुठलीही घट नसून वाढच दिसते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: नोव्हेंबर अखेर सूर्याला ताप, कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातील आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल