Konkan Red Alert: धोक्याची घंटा! मुंबई, ठाण्यात अतिवृष्टी होणार, कोकणावर संकट, 48 तासांसाठी रेड अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाने 48 तासांसाठी मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकणात हायअलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार सरींनंतर आज, 28 सप्टेंबर रोजीदेखील हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
2/5
शनिवारी दिवसभर पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला झोडपून काढले होते. आजही हीच परिस्थिती कायम राहणार आहे. आज मुंबई ठाणे नवी मुंबई या भागांत रेड अलर्ट आहे. आज सकाळपासूनच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि लोकल ट्रेन सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात आणि किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या सरींमुळे काही नद्या ओसंडू लागल्या आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
4/5
रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावर आणि अलिबाग, श्रीवर्धन, मुरूडसारख्या किनारी भागात मुसळधार सरी कोसळत आहेत. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाची भीती आहे. काही नद्या आणि ओढे धोक्याच्या पातळीच्या जवळ आल्याने प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर असून समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Konkan Red Alert: धोक्याची घंटा! मुंबई, ठाण्यात अतिवृष्टी होणार, कोकणावर संकट, 48 तासांसाठी रेड अलर्ट