TRENDING:

Weather Alert: कोकणात धो धो सुरूच, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात देखील पावसाची तीव्रता कायम असून आज मुंबईसह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
कोकणात धो धो सुरूच, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सुरू आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचणं, वाहतुकीत अडथळे निर्माण होणं, तसेच नवरात्र उत्सवाच्या तयारीवर पावसाचा परिणाम होत आहे. 24 सप्टेंबर रोजीही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण तुलनेने कमी असेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज यलो अलर्ट असल्यानं गेल्या दोन-तीन दिवसांप्रमाणे दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईत दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन आणि बस वाहतुकीवर पावसाचा थेट परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे नवरात्राच्या निमित्ताने संध्याकाळी होणाऱ्या दांडिया-गरबा कार्यक्रमांना पावसाचा मोठा फटका बसू शकतो.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारनंतर जोरदार सरींचा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाण्यातील ग्रामीण भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे. नवी मुंबईत बेलापूर, वाशी, नेरुळ भागांत मुसळधार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिली आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज वाऱ्याचा वेग मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. नदी-नाल्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून अलिबाग, मुरूड, पनवेल आणि महाड परिसरात विशेषतः खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण तुलनेने कमी असेल. या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून आकाश दिवसभर ढगाळ राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात धो धो सुरूच, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल