Weather Alert: वारं फिरलं! 48 तासानंतर पुन्हा संकट, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामान बदलत असून थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. 48 तासानंतर पुन्हा मोठ्या संकटाची शक्यता आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने थंडीचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. किमान तापमानात वाढ झाल्यामुळे सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा कमी झाला आहे, दुपारच्या वेळेत मात्र उष्णतेचा त्रास वाढताना दिसतो आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांनंतर पुन्हा थंडीला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आज 24 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार आहे? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. आकाश स्वच्छ असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नाही. सकाळच्या वेळेत सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर उन्हाचा तीव्रपणा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असून, किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. उष्णतेमुळे नागरिकांना दिवसा थकवा जाणवू शकतो.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात सकाळच्या वेळेत हवामान स्वच्छ राहील, तर दुपारनंतर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण दिसू शकतं. येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हलका गारवा जाणवेल, पण दुपारी सूर्यप्रकाशामुळे उष्णतेचा प्रभाव वाढेल.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत आज हवामान प्रामुख्याने स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेडसह मराठवाड्यात दिवसात उष्णता जाणवेल, तर सकाळी-रात्री सौम्य गारवा राहील. येथे कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 14 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भात नागपूरसह काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहील. नागपूरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
एकंदरीत पाहता, आज राज्यात हवामान कोरडं आणि उष्णतेकडे झुकलेलं राहणार आहे. पावसाची शक्यता नाही, मात्र सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवस तापमान असंच चढ-उताराचं राहणार असून, त्यानंतर किमान तापमानात थोडी घट होऊन थंडी पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वारं फिरलं! 48 तासानंतर पुन्हा संकट, हवामान विभागाने दिला अलर्ट