TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट! थंडी नव्हे, आता वेगळाच अलर्ट, गुरुवारचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. गुरुवारी काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/7
महाराष्ट्रात पुन्हा हवापालट! थंडी नव्हे, आता वेगळाच अलर्ट, गुरुवारचं अपडेट
गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या थंडीचा कडाका आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. सकाळी आणि रात्री काही भागांत सौम्य गारवा जाणवत असला, तरी दिवसभर उष्णतेचा त्रास वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 जानेवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस तापमान तुलनेने जास्तच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे.
advertisement
2/7
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आज ढगाळ वातावरणाचा प्रभाव जाणवणार आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत हलके धुके दिसू शकते, मात्र दिवसभर हवामान कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून पहाटे आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल. दिवसा मात्र सूर्यप्रकाशामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागात हलके वारे वाहतील, त्यामुळे हवेत आर्द्रता अधिक राहू शकते. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
advertisement
3/7
मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागात हलके वारे वाहतील, त्यामुळे हवेत आर्द्रता अधिक राहू शकते. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात आज पहाटे काही ठिकाणी गारवा जाणवेल, मात्र दिवसभर तापमानात वाढ होत उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात हवामान अंशतः ढगाळ राहील. पुण्यात सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता असून कमाल तापमान सुमारे 30 ते 31 अंश, तर किमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. ग्रामीण भागात पहाटे थंडी जाणवेल, पण दुपारनंतर उष्णतेचा प्रभाव वाढेल.
advertisement
5/7
मराठवाडा विभागात ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा कमी झाल्याचं जाणवत आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता असून दुपारनंतर हवामान निरभ्र राहील. कमाल तापमान 30 ते 32 अंश, तर किमान 16 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही तापमानात वाढ कायम असून थंडीचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णता जाणवेल. कमाल तापमान 31 अंशांच्या आसपास, तर किमान 13 ते 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दमट हवामान जाणवू शकते.
advertisement
6/7
विदर्भातही तापमानात वाढ कायम असून थंडीचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णता जाणवेल. कमाल तापमान 31 अंशांच्या आसपास, तर किमान 13 ते 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दमट हवामान जाणवू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, आज संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे मागील काही दिवसांतील थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, सकाळी व रात्री सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा अनुभव नागरिकांना येईल. राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर राहणार असून, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात फारसा बदल जाणवणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट! थंडी नव्हे, आता वेगळाच अलर्ट, गुरुवारचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल