TRENDING:

Weather Alert: कोकणात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्याला कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज मात्र हवामानात मोठे बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्याला कोणता अलर्ट?
गेल्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाने चांगलाच जोर धरला होता. अनेक ठिकाणी पावसाच्या सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आज पावसाने तुलनेने विश्रांती घेतली असून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच भागांत आज काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम सरी पडणार आहे.
advertisement
2/5
मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून सतत पावसाचा जोर कायम होता. पण आज पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात दिलासा मिळणार आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ राहील आणि अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी येतील. काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. समुद्रकिनाऱ्याजवळ वारे सौम्य ते मध्यम गतीने वाहतील.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात आज रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. ढगाळ वातावरण कायम राहील पण पावसाचा जोर जास्त नसेल. दिवसभर वातावरण दमट राहील आणि आर्द्रता जाणवेल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग सौम्य राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहणार आहे. पावसाचा पॅटर्न असमान असणार असून काही भागांत फक्त रिमझिम सरी पडतील, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दिवसभर वातावरण दमट आणि आर्द्र राहील. जिल्ह्यात आज कोणताही अलर्ट नाही, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर होता. मात्र आज पावसाची तीव्रता तुलनेने कमी होणार आहे. ढगाळ वातावरण राहून काही भागांत रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. मुसळधार पावसाचा धोका नाही आणि हवामान विभागाने कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. या भागांमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. किनारपट्टीवर वारे थोडेसे जोराने वाहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्याला कोणता अलर्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल