TRENDING:

Bullet Train : मोठी बातमी! पहिली बुलेट ट्रेन 'या' तारखेपासून धावणार; 2 तासांत मुंबईहून थेट अहमदाबाद गाठता येणार

Last Updated:
Bullet Train Project Update : मुंबई–अहमदाबाद पहिली बुलेट ट्रेन सुरू होण्याच्या मुहूर्ताची तारीख जाहीर झाली आहे. हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार असून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे सेवेचा अनुभव मिळणार आहे.
advertisement
1/7
पहिली बुलेट ट्रेन 'या' तारखेपासून धावणार; 2 तासांत मुंबईहून थेट अहमदाबाद
महाराष्ट्रासह विविध राज्यात अनेक वेगवान एक्सप्रेस ट्रेन धावतात मात्र सध्या सर्वांना प्रतिक्षा लागली आहे ती मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची. सध्या या बुलेट ट्रेनची सुरुवात कधीपासून होणार आहे याची अखेर तारीख समोर आलेली आहे.
advertisement
2/7
देशातील पहिली आणि सर्वात वेगवान हाय-स्पीड रेल्वे म्हणून ओळखली जाणारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन येत्या 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून केंद्रीय अर्थसंकल्पातही या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
3/7
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये 348 किमी गुजरातमध्ये, 4 किमी दादरा-नगर हवेलीमध्ये आणि 156 किमी मार्ग महाराष्ट्रात आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन 320 किमी प्रतितास वेगाने धावणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
advertisement
4/7
या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्वतीय बोगदा अवघ्या 12 महिन्यांत पूर्ण करण्यात आला आहे. अत्याधुनिक न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग तंत्रज्ञान, आधुनिक ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांच्या मदतीने हे काम यशस्वी झाले आहे.
advertisement
5/7
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी एकूण 7 पर्वतीय बोगदे उभारले जाणार असून त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. राहिलेल्या बोगद्यांची कामे वेगात सुरू आहेत.
advertisement
6/7
या प्रकल्पात एकूण 21 किलोमीटरचे बोगदे, त्यात 7 किमी समुद्राखालील बोगदे, तसेच 28 पूल उभारले जाणार आहेत. मार्गावर एकूण 12 स्थानके असतील.
advertisement
7/7
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Bullet Train : मोठी बातमी! पहिली बुलेट ट्रेन 'या' तारखेपासून धावणार; 2 तासांत मुंबईहून थेट अहमदाबाद गाठता येणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल