Mumbai train blasts : आरडाओरड, किंकाळ्या आणि पळापळ! 2006 मधील ब्लास्ट किती भीषण होता? पाहा त्यावेळीचे 11 Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai train blast 11 sensitive Photos : मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. घटनेनंतर 19 वर्षांनी हा निकाल आला आहे.
advertisement
1/11

उच्च न्यायालयाने म्हटलं की, अभियोक्ता पक्ष आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल दिला.
advertisement
2/11
सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी निर्णायक नाहीत, असंही खंडपिठाने म्हटलं आहे. लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटांत सात बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगापासून बोरीवलीपर्यंत संपूर्ण मुंबई हादरली होती.
advertisement
3/11
11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम उपनगरीय भागात सात गाड्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. यामध्ये 180 प्रवासी मृत्युमुखी पडले होते आणि 824 लोक जखमी झाले होते.
advertisement
4/11
स्फोट इतका जोरदार होता की ट्रेनच्या डब्याचे तुकडे झाले. पोलिसांनी आरोपपत्रात 30 जणांना आरोपी म्हणून नाव दिले होते. त्यापैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले.
advertisement
5/11
खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहीम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ हे स्फोट झाले. गाड्यांमध्ये लावलेले बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांपासून बनलेले होते.
advertisement
6/11
लोकल ट्रेनमधील सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात करण्यात आले. 11 जुलै 2006 रोजी सायंकाळी 6:24 ते 6:35 या वेळेत मुंबईत एकामागून एक सात स्फोट झाले.
advertisement
7/11
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मार्च 2006 मध्ये, लष्कर-ए-तैयबाच्या आझम चीमाने बहावलपूरमधील त्याच्या घरात सिमी आणि लष्करच्या दोन गटांच्या प्रमुखांसह या स्फोटांचा कट रचला होता.
advertisement
8/11
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात 30 आरोपींची नावे होती. त्यापैकी 13 जणांची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून झाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं.
advertisement
9/11
विशेष मकोका न्यायालयाने 11 सप्टेंबर 2015 रोजी निकाल दिला होता. त्यावेळी 13 आरोपींपैकी 5 दोषींना मृत्युदंड, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
advertisement
10/11
त्यानंतर 2016 मध्ये आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, खटला 9 वर्षे चालला. त्यानंतर 2019 मध्ये सुनावणी सुरू केली अन् आता 2025 मध्ये निकाल लागला आहे.
advertisement
11/11
दरम्यान, राज्यातील विविध तुरुंगांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींनी उच्च न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर आपल्या वकिलांचे आभार मानले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai train blasts : आरडाओरड, किंकाळ्या आणि पळापळ! 2006 मधील ब्लास्ट किती भीषण होता? पाहा त्यावेळीचे 11 Photos