कोकणात वारं फिरलं, पुढचे 3 दिवस पावसाचे, मुंबईत काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Weather Forecast: मुंबईसह कोकणाच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईत गारठा वाढत असतानाच कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
advertisement
1/5

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढत असतानाच हवामान विभागानं महत्त्वाचं अपडेट दिलंय. तर मुंबईत देखील आता हवापालट होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
राज्यात गारठा वाढत असतानाच मुंबईत मात्र हवी तशी थंडी पडली नसल्याने मुंबईकर पुरते हैराण झाले होते. आता मात्र मुंबईकरांसाठ आनंदाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांत थंडीचा कडाका वाढला असून पारा 20 अंशांपर्यंत घसरला आहे.
advertisement
3/5
मुंबईचे किमान तापमान आज 26 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यासोबत आज हवेची आर्द्रता पातळी 50 टक्के असेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आकाश निरभ्र राहील.
advertisement
4/5
मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे, पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत असून हवेतील आद्रतेचं प्रमाण देखील कमी होत आहे. पुढील 2 दिवसात तापमान आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण कोकणात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.