TRENDING:

Mumbai Rain: 24 तास महत्त्वाचे! मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, कोकणात हायअलर्ट!

Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाणे परिसराला यलो अलर्ट देण्यता आला आहे.
advertisement
1/5
Mumbai Rain: 24 तास महत्त्वाचे! मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, कोकणात हायअलर्ट!
महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज 24 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी यलो अलर्ट, तर कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासूनच आकाश ढगाळ असून काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज रात्रीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. शहराचे तापमान 27 अंश ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून, आर्द्रता 80 टक्क्यांहून अधिक आहे. समुद्रातही भरतीच्या वेळेस 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, रेल्वे व रस्ते वाहतूक यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यातही सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, काही भागात विजांचा कडकडाट सुरू आहे. जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता असून, तापमान 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. ठाण्यात विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली.
advertisement
4/5
कोकण विभागामध्ये, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देत दक्षतेचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवरील गावांमध्ये मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील 24 तास किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, पावसाचा जोर अधिक असल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
advertisement
5/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यांवर, जोरदार पावसाचे सत्र कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे, गरज असेल तरच प्रवास करावा आणि अधिकृत हवामान अंदाज नियमितपणे पाहावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: 24 तास महत्त्वाचे! मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, कोकणात हायअलर्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल