धर्मध्वजाला पीएम मोदीकडून वंदन, 500 वर्षांपासूनचा संकल्प आज पूर्ण, अयोध्येतील राम मंदिराचे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अयोध्येत राम मंदिरावर ७०० टन वजनाचा धर्मध्वज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकवला गेला. सोहळ्यात मोहन भागवत, योगी आदित्यनाथ उपस्थित होते. परिसर जय श्री रामच्या घोषाने दुमदुमला.
advertisement
1/6

अयोध्येत राम मंदिर व्हावं हे 500 वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्यावर आज धर्मध्वजारोहणही करण्यात आलं. या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांनी वंदन केलं आहे. तब्बल ७०० टन वजनाच्या आणि ४४ फूट लांब असा हा धर्मध्वज अखेर राम मंदिरावर फडकवण्यात आला. त्याला पीएम मोदींनी वंदन केलं आहे.
advertisement
2/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ध्वज फडकवण्यात आला. अभिजीत मुहूर्तावर, बरोबर ११:४५ वाजता, पीएम मोदींनी रिमोटचे बटण दाबले आणि अवघ्या ४ मिनिटांत हा ध्वज मंदिराच्या शिखरावर पोहोचला. जसा ध्वज शिखरावर पोहोचला, तसा संपूर्ण परिसर 'जय श्री राम'च्या जयघोषाने दुमदुमला होता. अत्यंत भक्तीमय वातावरणात हा ध्वजारोहण सोहळा आज पार पडला.
advertisement
3/6
या भव्य ध्वजावर प्रभू श्री राम यांची प्रतिमा आणि वीरतेचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य यांचे चित्र आहे. यासोबतच त्यावर कोविदार वृक्षाचे चित्र आणि 'ॐ' देखील अंकित आहे. पुराणांनुसार, कोविदार वृक्ष हे रामराज्याच्या ध्वजात अंकित असलेले राजचिन्ह मानले जाते. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आजचा दिवस सुवर्ण इतिहासात नोंदवला गेला आहे.
advertisement
4/6
या सोहळ्याला पीएम मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. हा ऐतिहासिक सोहळा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुभ पंचमीला, श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता.
advertisement
5/6
५०० क्विंटलहून अधिक फुलांचा वापर करून नगर निगमने रामपथ सजवला होता. सर्वत्र अशी सुंदर सजावट करण्यात आली होती, जणू राम राज्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा होत आहे. धर्मध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो करत राम जन्मभूमी परिसरातील मंदिरात पोहोचले.
advertisement
6/6
सर्वप्रथम सप्त ऋषी मंदिरात जाऊन महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मीकि, देवी अहिल्या, निषादराज गुह आणि माता शबरी यांचे दर्शन घेतले. राम दरबारच्या गर्भगृहात पोहोचून रामललांचे विधिवत दर्शन-पूजन केले आणि आरती केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
धर्मध्वजाला पीएम मोदीकडून वंदन, 500 वर्षांपासूनचा संकल्प आज पूर्ण, अयोध्येतील राम मंदिराचे PHOTO