कराडच्या डायबेटोलॉजिस्ट डॉ. गौरी ताम्हणकर यांनी एका मुलाखतीत डायबेटिजबाबत बरीच माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी सासू, सून आणि डायबेटिज याचा उल्लेख केला आहे. एखादी महिला सासू बनल्यावर तिला 100 टक्के डायबेटिज होतो, असं त्या म्हणाल्या. आता त्यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे, ते समजून घेऊयात.
advertisement
डॉ. गौरी ताम्हणकर म्हणाल्या, डायबेटिजचं प्रमाण शहराइतकंच खेडेगावातही आहे. कारण शहरीकरणाचा वेग इतका वेगाने वाढला आहे की तो खेड्यापर्यंत पोहोचला आहे. शेतात यांत्रिकीकरण आलं आहे. त्यामुळे फार कष्ट नाही, शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर आहेत, त्यामुळे सहज शहरात येतात. आता शहरी आणि ग्रामीण भागात फार राहिलेला नाही. आम्ही असं गमतीने म्हणतो की, जेव्हा एखादी महिला सासू बनते, सून येते तेव्हा तिला 100 टक्के डायबेटिज होतो. कारण सासू बसून राहतात आणि सुनेला कामाला लावतात.
खेडेगावातील प्रमाण कमी आहे असं जाणवायचं कारण तिथं टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे. जितकी जागरूकता शहरी भागात आहे, जसं शहरात त्रास होत असेल तर लोक टेस्टिंग करायला जातात किंवा काही कंपन्या टेस्ट करतात. तितकी जागृती खेडेगावात नाही. जरी शुगर आहे कळलं तरी बाकीच्यांचे सल्ले असतात की कमी आहे, अजून पाहुयात, थोड्या दिवसांनी जाऊयात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे खेडेगावात डायबेटिजचं प्रमाण कमी वाटतं.
मधुमेहाचे प्रकार, कारणं, लक्षणं
मधुमेहाचे प्रीडायबेटिज, टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह, टाइप 3सी मधुमेह, प्रौढांमधील सुप्त ऑटोइम्युन मधुमेह, प्रेग्नन्सीतील मधुमेह, लहान मुलांमध्ये परिपक्वता सुरू होणारा मधुमेह, नवजात शिशुतील मधुमेह, ठिसूळ मधुमेह असे अनेक प्रकार आहेत.
इन्सुलिन प्रतिरोधकता, ऑटोइम्यून रोग, हार्मोनल असंतुलन, स्वादुपिंडाचं नुकसान, अनुवांशिक उत्परिवर्तन, काही औषधांचा दीर्घकाळ वापर ही मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतात.
वारंवार तहान लागणं, तोंड कोरडं पडणं, वारंवार लघवी होणं, थकवा, धूसर दृष्टी , वजन कमी होणं, हात किंवा पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं, जखम, व्रण बरं होण्यात वेळ, त्वचा किंवा योनीतून यीस्टचे संक्रमण.
