लग्न होऊन फक्त एक महिना, त्याआधी रिलेशन नाही तरी महिला दीड महिन्याची प्रेग्नंट; डॉक्टरांनीच सांगितलं हे कसं शक्य आहे
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy News : एक महिन्याच्या लग्नात दीड महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या या महिलेचं प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ज्या डॉक्टरकडे ही महिला गेली होती, त्या डॉक्टरनीच सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
एक महिला जिचं 30 दिवसांपूर्वीच लग्न झालं. म्हणजे तिच्या लग्नाला एक महिना झाला. पण ही महिला दीड महिन्याची प्रेग्नंट आहे. आता तुम्ही म्हणाल की त्या महिलेने आधी शारीरिक संबंध ठेवले असावेत तर तसंही नाही. महिलेने लग्नानंतर पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले होते. पण चाचणीत ती दीड महिन्याची गर्भवती असल्याचं समोर आलं. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
एक महिन्याच्या लग्नात दीड महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या या महिलेचं प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या महिलेमध्ये काही दिवसांपासून प्रेग्नन्सीची लक्षणं दिसत होती. म्हणून ती टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे केली. डॉक्टरांनी तिची टेस्ट केली, रिपोर्ट दिला तो पाहून तिला धक्काच बसला. डॉक्टरंनी तिला सांगितलं की दीड महिन्याची प्रेग्नंट आहे. पण तिचं लग्न 30 दिवसांपूर्वीच झालं, लग्नाच्या रात्री तिने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले, मग हे कसं काय झालं? ती महिलाही घाबरली.
advertisement
पण तिची टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनीच तिला हे कसं शक्य झालं ते सांगितलं. त्यांनी यामागील सायन्स समजावलं. प्रेग्नन्सीची डेट कशी मोजली जाते हे डॉक्टरांनी समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की, गर्भधारणेचं वय गर्भधारणेच्या दिवसापासून मोजलं जात नाही, कारण गर्भधारणेची नेमकी तारीख निश्चित करणं कठीण असते. त्यामुळे तो महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीच्या (LMP) पहिल्या दिवसापासून मोजलं जातो. याला गर्भधारणेचं वय म्हणतात. कारण ओव्हुलेशन आणि गर्भधारणा सामान्यतः शेवटच्या मासिक पाळीच्या सुमारे दोन आठवड्यांनंतर होतं.
advertisement
advertisement
म्हणून जर अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भ दीड महिन्याचा असल्याचं दिसून आलं तर याचा अर्थ ती स्त्री दीड महिन्यापूर्वी प्रेग्नंट झाली असं नाही. तर तिला तिच्या शेवटच्या मासिक पाळीला दीड महिने झाले असा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ही महिला लग्नाच्या रात्री किंवा लग्नानंतर तिच्या पतीसोबत पहिल्यांदाच लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भवती राहिली.
advertisement
ज्या डॉक्टरांकडे ही महिला गेली होती त्यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. @drshobha.fc इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 24, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्न होऊन फक्त एक महिना, त्याआधी रिलेशन नाही तरी महिला दीड महिन्याची प्रेग्नंट; डॉक्टरांनीच सांगितलं हे कसं शक्य आहे


