TRENDING:

मेट्रोत चुकूनही या वस्तू नेऊ नका, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, तुरुंगातही होणार रवानगी!

Last Updated:
अनेक मेट्रो शहरांमध्ये मेट्रो ही तेथील लाइफ लाइन आहे. मेट्रो फक्त एक सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाचे माध्यमच नाही तर या मेट्रोमुळे ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणापासूनही बचाव करता येतो. त्यामुळे सर्वच स्तरावरील लोकं या मेट्रोमधून प्रवास करतात. पण मेट्रोमध्ये काही वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. तुम्ही या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच तुरुंगातही जाऊ लागू शकते. अनेकांना याबाबत माहिती नसेल. त्यामुळे या वस्तू कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात. (अभिषेक तिवारी/दिल्ली, प्रतिनिधी)
advertisement
1/5
मेट्रोत चुकूनही या वस्तू नेऊ नका, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, तुरुंगातही..
दिल्ली मेट्रोमध्ये अंमली पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची औषधे किंवा अल्कोहोल समाविष्ट आहे. जर तुम्ही कोणत्याही अमली पदार्थासह पकडला गेलात तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तसेच मोठा दंडही भरावा लागतो.
advertisement
2/5
ॲसिड किंवा पेट्रोलियमसारखे ज्वलनशील पदार्थही मेट्रोमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. या पदार्थांपासून आग लागण्याचा धोका असतो. म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही या पदार्थांसह पकडले गेले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.
advertisement
3/5
यासोबतच कोणत्याही प्रकारची शस्त्रे किंवा दारूगोळा नेण्यास दिल्ली मेट्रोमध्ये सक्त मनाई आहे. यामध्ये बंदूक, चाकू, तलवार, बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ यांचा समावेश आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान तुम्ही या गोष्टींसह पकडले गेले तर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते आणि तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
advertisement
4/5
तसेच चाकू, नेल कटर, कात्री आदी धारदार वस्तू मेट्रोमध्ये नेण्यासही बंदी आहे. या वस्तूंमुळे कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा इजा होऊ शकते. सुरक्षा तपासणीदरम्यान या वस्तू तुमच्याकडे आढळल्यास, तुम्हाला त्या त्वरित जमा कराव्या लागतील आणि दंडही भरावा लागेल.
advertisement
5/5
दिल्ली मेट्रोमध्ये पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यासही मनाई आहे. यामध्ये श्वान, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांना मेट्रोमध्ये घेऊन जाण्यास परवानगी नाही. यामुळे प्रवाशांना असुविधा होऊ शकतो आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही जर पाळीव प्राण्यासह मेट्रोमध्ये पकडले गेले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
मेट्रोत चुकूनही या वस्तू नेऊ नका, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, तुरुंगातही होणार रवानगी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल