22 तास नोटा मोजून फुटला घाम, हात थकले तरी कॅश संपेना, देशातील सर्वात मोठी रेड
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राजेश मिश्रा यांच्या मानिकपूर घरात पोलिसांनी छापा टाकून २ कोटींच्या १०, २०, ५०, १०० नोटा, ६ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मैक जप्त केले, कुटुंबही तस्करीत सामील.
advertisement
1/7

10, 20, 50 आणि 100 बापरे, इतक्या नोटा की पाहून अधिकारी हैराण झाले, पोलिसांना मोजायला बसवलं, पण अक्षरश: मोजेपर्यंत घाम फुटला. घामाच्या धारा वाहू लागल्या पण मोजून काही केल्या संपेना, शेवटची मशीन आल्या आणि त्याही गरम झाल्या. 22 तासांनंतर अखेर मोजणी थांबली.
advertisement
2/7
एका कुख्यात गांजा तस्कराच्या घरी पोलिसांनी छापा टाकला, घरातून गांजासोबत तब्बल २ कोटी रुपयांची रोकड सापडली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण रक्कम केवळ १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांच्या बंडलांमध्ये होती. या अफाट रोकडमुळे, नोटा मोजायला लागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली.
advertisement
3/7
पोलीस आणि तपास पथकाने गांजा तस्कर राजेश मिश्रा याच्या घरात सापडलेल्या नोटा मोजायला सुरुवात केली. पण काही वेळातच पोलीस कर्मचारी, विशेषतः महिला पोलीस, नोटा मोजून थकून गेल्या. पैशांचा ढीग इतका मोठा होता की, कर्मचाऱ्यांना वारंवार ब्रेक घ्यावा लागला आणि घाम पुसावा लागला. पैशांचा ढिग काही संपायचा नाही, ते पाहून पोलीसही चक्रावले.
advertisement
4/7
अखेरीस, पोलीस पथकाला नोटा मोजण्यासाठी तातडीने चार मोजणी मशीन मागवाव्या लागल्या, त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यात नोटांचा ढीग आणि थकून गेलेले पोलीस कर्मचारी दिसत आहेत.
advertisement
5/7
हा तपास इतका सोपा नव्हता. सीओ यांच्या नेतृत्वाखालील ४ पोलीस पथके तस्कर राजेश मिश्रा याच्या मानिकपूर येथील घरी पोहोचली. सराईत गुन्हेगार असलेल्या राजेशवर गांजा, तस्करीसह १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि सध्या तो तुरुंगात आहे. २२ पोलीस कर्मचाऱ्यांनी ४ गाड्यांमधून येऊन तब्बल २४ तास घराची कसून तपासणी केली.
advertisement
6/7
घरातील तीन खोल्यांमध्ये, कपाटात, बॉक्समध्ये, डब्यांमध्ये आणि थेट बेडच्या आतमध्ये पन्न्या, पिशव्या आणि गोण्यांमध्ये नोटांचे बंडल लपवलेले सापडले. या तपासणीत, गुन्हेगारीच्या या पैशांसोबतच घरातून ६ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मैक देखील जप्त करण्यात आले.
advertisement
7/7
या गुन्हेगारी नेटवर्कचा सर्वात धक्कादायक खुलासा हा आहे की, राजेश मिश्राचे संपूर्ण कुटुंब या नशेच्या धंद्यात सामील आहे. राजेश जेलमधूनच त्याची पत्नी रीना मिश्रा हिच्या माध्यमातून हा सारा अवैध धंदा चालवत होता. पत्नी रीना पतीच्या आदेशानुसार गावात आणि आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांचा व्यवसाय पसरवत होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
22 तास नोटा मोजून फुटला घाम, हात थकले तरी कॅश संपेना, देशातील सर्वात मोठी रेड