TRENDING:

Ind vs Pak: पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न, भारताने धडा शिकवला, लाहोर-रावळपिंडीत जाळ आणि धूर संगटच...

Last Updated:
Ind vs Pak: गुरुवारी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे
advertisement
1/5
पाककडून हल्ल्याचा प्रयत्न, भारताने धडा शिकवला,लाहोर-रावळपिंडीत जाळ आणि धूर संगटच
सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना पाकिस्तान सतत बदल्याची भाषा बोलत आहे. दरम्यान पाकिस्तानने भारतातील काही शहरे लक्ष्य करण्याची रणनीती आखलेली असतानाच पाकिस्तानी सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटला अर्थात रडार यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली.
advertisement
2/5
पाकिस्तानने भारतात १५ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचा प्रयत्न भारताने हाणून पडत प्रत्युत्तरदाखल भारताने मोठी कारवाई केली. सियालकोट, लाहोर आणि पाकिस्तानच्या आणखी काही शहरात भारताने हल्ले केले आहेत.
advertisement
3/5
गुरुवारी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे.
advertisement
4/5
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातील ९ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. लाहोर व्यतिरिक्त, गुजरावाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथेही असेच ड्रोन हल्ले भारताने केले आहेत.
advertisement
5/5
रॉयटर्स आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, लाहोरमधील वॉल्टन विमानतळाजवळ मोठ्या स्फोटांची मालिका सुरू झाली, ज्यामुळे सायरन वाजले आणि लोक घराबाहेर पडले. अनेक लोक घाबरून घराबाहेर पडताना दिसत होते आणि त्यांना धुराचे लोटही दिसले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Ind vs Pak: पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न, भारताने धडा शिकवला, लाहोर-रावळपिंडीत जाळ आणि धूर संगटच...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल