TRENDING:

'ती माझीच चूक...', तुटलेल्या रिलेशनशिप्सवर पहिल्यांदाच बोलला सलमान खान, सांगितलं नातं मोडण्याचं खरं कारण

Last Updated:
Salman Khan Relationships : सलमान खान नुकताच तो काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या एका शोमध्ये आला होता, जिथे त्याने त्याच्या ब्रेकअप्सबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/7
'ती माझीच चूक...', तुटलेल्या रिलेशनशिप्सवर पहिल्यांदाच बोलला सलमान खान
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. आजही त्याच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिबद्दल अनेक लोक बोलत असतात.
advertisement
2/7
नुकताच तो काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या एका शोमध्ये आला होता, जिथे त्याने त्याच्या ब्रेकअप्सबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/7
सलमान खानने त्याच्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणाने सांगितलं. तो म्हणाला, “एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरपेक्षा जेव्हा जास्त पुढे जातो, तेव्हा मतभेद सुरू होतात. तेव्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होते.”
advertisement
4/7
त्याने स्वतःच्या चुका मान्य करत म्हटलं, “जेव्हा एक गर्लफ्रेंड गेली, तेव्हा मला वाटलं की चूक तिची होती. जेव्हा दुसरी गेली, तेव्हा मला वाटलं की चूक तिचीच होती. जेव्हा तिसरी गेली, तेव्हा मला वाटलं की चूक तिचीच होती. पण, जेव्हा चौथी गर्लफ्रेंड गेली, तेव्हा मला थोडी शंका आली की, चूक माझी आहे की तिची.”
advertisement
5/7
सलमान पुढे म्हणाला, “जेव्हा त्यापेक्षा जास्त ब्रेकअप्स झाले, तेव्हा मला खात्री झाली की, चूक माझीच होती. खरं सांगायचं तर, जर कुणाला दोषी ठरवायचं असेल, तर मीच दोषी आहे.”
advertisement
6/7
तो म्हणाला की, “जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये काही जमलं नाही, तर नाही जमलं. त्यात कुणाला दोष देण्याची गरज नाही.” यावरून असं दिसतं की, सलमान खानने त्याच्या चुका मान्य केल्या आहेत.
advertisement
7/7
सलमान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून ‘बिग बॉस १९’ होस्ट करतानाही तो खूप चर्चेत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती माझीच चूक...', तुटलेल्या रिलेशनशिप्सवर पहिल्यांदाच बोलला सलमान खान, सांगितलं नातं मोडण्याचं खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल