Mobile Signal : ...म्हणून तुमच्या मोबाईलचा सिग्नल गायब होत होता; यामागे कोट्यवधी रुपयांचा गेम, दुबईशी कनेक्शन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Signals : एखाद्या दुर्गम भागात, गावात, मोबाईल टॉवर नाही अशा ठिकाणी मोबाईलचं सिग्नल जाणं ठिक आहे पण काही वेळा आपण अशा ठिकाणी असतो जिथं आपल्याला फुल नेटवर्क आहेत, तरी मधेच मोबाईलचं सिग्नल जातं, याचं दुबई कनेक्शन समोर आलं आहे.
advertisement
1/5

देशभरात मोबाईल नेटवर्क विस्कळीत करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आंतरराज्यीय कक्षाने मोबाईल टॉवरमधून मौल्यवान उपकरणं चोरून परदेशात पाठवणाऱ्या रॅकेटच्या सूत्रधाराला अटक केली आहे. दिल्लीतील धौला कुआन परिसरात दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचं नाव आफताब उर्फ रेहान (28) असं आहे, जो दिल्लीच्या गोकलपुरी भागातील रहिवासी आहे. त्याचा साथीदार रबनवाज उर्फ बॉबी (40) याच्यावर पोलिसांनी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
2/5
तपासात असं दिसून आलं की, या टोळीने प्रथम दिल्लीच्या ट्रान्स-यमुना भागातील मोबाईल टॉवरमधून चोरी केलेले रेडिओ रिमोट युनिट गोळा केले आणि नंतर ते भंगार असल्याचे सांगून दुबईला पाठवण्याची योजना आखली. रेडिओ रिमोट युनिट हा मोबाईल टॉवरचा एक महत्त्वाचा आणि महागडा भाग आहे. प्रत्येक युनिटची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये आहे. त्यांच्या चोरीमुळे केवळ टेलिकॉम कंपन्यांचे मोठं आर्थिक नुकसान होत नाही तर नेटवर्क सेवा देखील विस्कळीत होतात.
advertisement
3/5
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमधून अशा चोरीच्या बातम्या पोलिसांना बऱ्याच काळापासून मिळत आहेत. 26 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने गुप्त माहितीवरून कारवाई केली. निरीक्षक शिवराज सिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चोरीचे रेडिओ रिमोट कंट्रोल युनिट्स निर्यात करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला रोखलं. त्यातून चोरीचे 130 रेडिओ रिमोट कंट्रोल युनिट्स जप्त करण्यात आले. ज्यांची किंमत या कारवाईमुळे अंदाजे 2 कोटी रुपये आहे.
advertisement
4/5
चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केलं की त्यांनी विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या चोरांकडून हे रेडिओ रिमोट युनिट्स सुमारे 90000 रुपये प्रति युनिट दराने खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी वाहतूकदारांच्या मदतीने बनावट बिलं आणि कागदपत्रं तयार करून त्यांना भंगार म्हणून दावा केला आणि कस्टम क्लिअरन्स मिळवला. तपासात असंही उघड झालं की आफताब यापूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये अशाच 10 प्रकरणांमध्ये सहभागी आहे.
advertisement
5/5
जप्त केलेल्या रेडिओ रिमोट युनिट्सची पडताळणी करण्यासाठी एअरटेलच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आलं होते, त्यांनी सांगितलं की यापैकी 60 युनिट्स विविध राज्यांमध्ये असलेल्या त्यांच्या मोबाइल टॉवर्समधून चोरीला गेले आहेत. उर्वरित युनिट्सची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस आता फरार संशयितांचा आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Mobile Signal : ...म्हणून तुमच्या मोबाईलचा सिग्नल गायब होत होता; यामागे कोट्यवधी रुपयांचा गेम, दुबईशी कनेक्शन