TRENDING:

खासदाराचा मुलगा आणि होणारी सून, वयाच्या 3 वर्षांपासून आहेत बेस्ट फ्रेंण्ड्स, ओळखला हे कोण आहेत?

Last Updated:
तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारे ते दोन चेहरे ओळखले का? वयाच्या तीन वर्षांपासून हे दोघंही एकमेकांचे खास मित्र-मैत्रिण आहेत. आता तर एकमेकांचे पार्टनर होत आहेत. यांच्या मैत्रीची, प्रेमाची आणि लग्नाची बातमी आता कन्फर्म झाली आहे. खासदाराचा मुलगा आणि होणारी सून वयाच्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
advertisement
1/7
खासदाराचा मुलगा आणि होणारी सून, वयाच्या 3 वर्षांपासून आहेत बेस्ट फ्रेंण्ड्स
तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारे ते दोन चेहरे ओळखले का? वयाच्या तीन वर्षांपासून हे दोघंही एकमेकांचे खास मित्र-मैत्रिण आहेत. आता तर एकमेकांचे पार्टनर होत आहेत. यांच्या मैत्रीची, प्रेमाची आणि लग्नाची बातमी आता कन्फर्म झाली आहे. खासदाराचा मुलगा आणि होणारी सून वयाच्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
advertisement
2/7
या दोघांचे लहानपणीचे फोटो आणि आताचे फोटो सोशल मीडियावर स्वत: खासदाराने शेअर केले आहेत. मागच्या 7 वर्षांपासून हे दोघं डेट करत असून दोघांनी ही गोष्ट गुप्त ठेवली होती. साखरपुडाही खासगी पद्धतीनं केला. या दोघांचे आई वडील देखील एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत. थोडक्यात फॅमेली फ्रेंड्स आहेत. त्यामुळे दोन्ही घरातील संबंध अत्यंत खास असल्याचं समजलं जात आहे.
advertisement
3/7
एक आहे गांधी घराण्याचा नातू रेहान वाड्रा आणि दुसरी आहे त्याची आयुष्याची जोडीदार अवीवा बेग. विशेष म्हणजे, अवीवा आणि रेहान हे केवळ आताचे जोडीदार नाहीत, तर ते एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतात. प्रियंका गांधी आणि अवीवाच्या आई नंदिता बेग या जुन्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे रेहान आणि अवीवा यांची मैत्रीही अगदी बालपणापासूनची आहे.
advertisement
4/7
गेल्या ७ वर्षांपासून हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. रेहान आणि अवीवा या दोघांनाही फोटोग्राफीची प्रचंड ओढ आहे आणि याच छंदाने त्यांना अधिक जवळ आणले. अखेर २९ डिसेंबर २०२५ रोजी या दोघांनी एकमेकांना अंगठी घालून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
advertisement
5/7
अवीवा बेग ही दिल्लीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. तिचे वडील इम्रान बेग हे नामांकित व्यावसायिक आहेत, तर आई नंदिता बेग या प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहेत. गांधी कुटुंबाशी त्यांचे नाते किती जवळचे आहे, याचा अंदाज यावरूनच येतो की काँग्रेस मुख्यालय असलेल्या 'इंदिरा भवन'चे इंटिरियर डिझाइन स्वतः नंदिता बेग यांनीच केले आहे.
advertisement
6/7
अवीवा ही केवळ एका मोठ्या कुटुंबाची मुलगी नाही, तर ती स्वतःच्या पायावर उभी असलेली एक यशस्वी तरुणी आहे. तिने मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. 'Atelier 11' या फोटोग्राफिक स्टुडिओची ती सह-संस्थापक असून अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत तिने काम केले आहे. याशिवाय तिने अनेक नामांकित मासिकांमध्ये एडिटर आणि मार्केटिंग क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे.
advertisement
7/7
मुलाच्या आयुष्यातील या मोठ्या निर्णयावर वडील रॉबर्ट वाड्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "मुलगा आता मोठा झाला आहे, त्याला त्याची जीवनसाथी मिळाली आहे. रेहानच्या आयुष्यात नेहमी सुख-समाधान राहो, हीच इच्छा." साखरपुड्यानंतर हे संपूर्ण कुटुंब राजस्थानमधील रणथंभोर येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचले असून, लवकरच लग्नाची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
खासदाराचा मुलगा आणि होणारी सून, वयाच्या 3 वर्षांपासून आहेत बेस्ट फ्रेंण्ड्स, ओळखला हे कोण आहेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल