TRENDING:

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वेमंत्री वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Last Updated:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरत ते बिलिमोरा सुरू होईल, तर संपूर्ण मार्ग २०२९ मध्ये कार्यान्वित होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
advertisement
1/6
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वेमंत्री वैष्णव यांनी थेट तारीखच
पीएम नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे. याचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं आहे. मुंबईसाठी बुलेट ट्रेन कधी सुरू होणार याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे.
advertisement
2/6
मुंबई-अहमदाबाद प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती वेगाने सुरू असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे.
advertisement
3/6
रेल्वेमंत्र्यांनी आज सुरत येथील बांधकाम सुरू असलेल्या बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिली आणि ट्रॅक बसवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाची निश्चित वेळ जाहीर केली.
advertisement
4/6
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सुरत ते बिलिमोरा (गुजरात) दरम्यानचा ५० किलोमीटरचा पहिला टप्पा २०२७ सालापर्यंत सुरू केला जाईल. यानंतर, संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद मार्ग २०२९ सालापर्यंत कार्यान्वित होईल.
advertisement
5/6
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचे अंतर अवघ्या दोन तास सात मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. सध्या हे अंतर कापायला ६ ते ७ तास लागतात. या क्रांतिकारी बदलामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, दोन्ही शहरांमधील व्यावसायिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.
advertisement
6/6
रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करत, हा भारताचा गौरव वाढवणारा प्रकल्प ठरेल, असे मत व्यक्त केले. बुलेट ट्रेनचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या जवळ आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वेमंत्री वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल