पुणे पोलिसांचा बुलडोझर पॅर्टन
काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये टिपू पठाणवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्या बेकायदेशीर व्यवसायांना नियंत्रित करण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता पुणे पोलिसांचा बुलडोझर पॅर्टन देखील पहायला मिळाला आहे.
अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
advertisement
पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर परिसरातील हे बांधकाम नियमबाह्य होते आणि त्याचा उपयोग स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केला जात होता. यामुळे, पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकांनी आज सकाळी बांधकामावर निष्कासन मोहीम राबवून संपूर्ण अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
परिसरात दहशतीचं वातावरण
दरम्यान, या कारवाईच्या वेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अवैध मार्गाने उभारलेल्या या रचनेवर अखेर कायदेशीर हातोडा पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. तसेच परिसरात दहशतीचं वातावरण देखील कमी झाल्याचं पहाया मिळत आहे.