TRENDING:

'No PUC, No Fuel' भाजप सरकारने या राज्यात घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मोठा धक्का

Last Updated:
दिल्ली सरकारने 18 डिसेंबरपासून PUC नसलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल न देण्याचा निर्णय घेतला असून, डीलर असोसिएशनने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
advertisement
1/6
'No PUC, No Fuel' भाजप सरकारने या राज्यात घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मोठा धक्
दुचाकी चारचाकी गाड्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात तर आता तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही. याचं कारण म्हणजे तुमची आधी PUC आहे का ते चेक केलं जाईल त्यानंतरच पेट्रोल डिझेल मिळेल. याबाबतची मोठी घोषणा राजधानी दिल्लीत करण्यात आली आहे. जर PUC नसेल तर पेट्रोल न देण्याचा सक्त आदेश काढण्यात आले आहेत.
advertisement
2/6
हा नियम 18 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आधी टाकी फुल्ल करा आणि त्यासोबत तुमची PUC संपली असेल तर ती लगेच काढून घ्या नाहीतर तुमचं काही खरं नाही. तर दुसरीकडे याच निर्णयाला पेट्रोल पंप चालकांनी काहीसा विरोध केला आहे. याचं कारण म्हणजे आम्ही PUC चेक करायचं की पेट्रोल द्यायचं असा सवाल सरकारला विचारला आहे.
advertisement
3/6
दिल्ली सरकारने 18 डिसेंबरपासून वैध PUC प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पेट्रोल पंप चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येक वाहनाचे PUC प्रमाणपत्र तपासणे प्रत्यक्षात शक्य आहे का, असा प्रश्न डीलर असोसिएशनकडून उपस्थित केला जात आहे. डीलर असोसिएशनने पर्यावरण मंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असून, या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
advertisement
4/6
जर पंपवरील कर्मचारी प्रत्येक वाहनाचे प्रमाणपत्र तपासण्यात अडकले, तर पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतील, असा त्यांचा दावा आहे. यामुळे केवळ इंधन भरण्यास विलंब होणार नाही, तर आसपासच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
डीलर्सनी आणखी एक गंभीर बाब अधोरेखित केली आहे. प्रमाणपत्र मागितल्यास अनेक वाहनचालकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते आणि त्यातून कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद, भांडण किंवा मारहाणीचे प्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी 10 ते 15 वर्षे जुन्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी बसवण्यात आलेल्या ANPR कॅमेऱ्यांचा प्रयोग अवघ्या दोन दिवसांत अपयशी ठरल्याचेही त्यांनी आठवण करून दिली आहे.
advertisement
6/6
18 डिसेंबरपासून दिल्लीमध्ये फक्त BS6 मानकांची वाहनेच प्रवेश करू शकतील. री दिल्लीबाहेरून येणाऱ्या खासगी वाहनांचे इंजिन BS4 आहे की BS6, हे तपासण्यासाठी सध्या कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. मात्र त्याबाबत सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
'No PUC, No Fuel' भाजप सरकारने या राज्यात घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना मोठा धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल