TRENDING:

Film Story : 5 वर्षे थिएटरमध्ये चालली ही फिल्म, बजेटच्या पाचपट कमाई

Last Updated:
Dhurandhar 2 Like Film : आज ज्याप्रमाणे धुरंधर 2 साठी क्रेझ दिसते आहे, ही पहिल्यांदाच नाही. 51 वर्षांपूर्वीही एका हिंदी फिल्मचं असंच वादळ आलं होतं.
advertisement
1/7
Film Story : 5 वर्षे थिएटरमध्ये चालली ही फिल्म, बजेटच्या पाचपट कमाई
आज जिथं तिथं धुरंधर 2 चीच चर्चा, त्याचीच क्रेझ पाहायला मिळते आहे. फिल्मने रिलीजआधी आणि रिलीजनंतरही अनेक रेकॉर्ड केले आहेत. फिल्म रिलीज होऊन कित्येक दिवस झालेत पण फिल्म पाहण्यासाठी थिएटरमध्ये होणारी गर्दी कमी होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाही आहेत. SACNILC नुसार, धुरंधर द रिव्हेंज फिल्मने 8 दिवसांत अंदाजे 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
2/7
पण एखाद्या हिंदी चित्रपटासाठी अशी इतकी क्रेझ असण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास 51 वर्षांपूर्वी, एका फिल्मनेही असंच वातावरण निर्माण केलं होतं. ज्याप्रमाणे आज 'धुरंधर 2' ला चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारी फिल्म म्हटली जाते.  त्याचप्रमाणे त्या काळात या हिंदी फिल्मनेही चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला.
advertisement
3/7
तेव्हा तिकीट मिळवण्यासाठी लोक तासन्तास रांगेत उभे राहायचे, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमायची. फिल्मची स्टोरी, डायलॉग आणि आणि अॅक्शनने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली. तो फक्त एक चित्रपट न राहता, एक असा सिनेमॅटिक अनुभव बनला, जो लोकांना पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत होता.
advertisement
4/7
तुम्हाला विश्वास बसणार नाही ही फिल्म एका थिएटरमध्ये जवळपास सलग 5 वर्षे चालली. त्या काळात एखादा चित्रपट इतका काळ चालणं म्हणजे काही साधं नव्हतं.
advertisement
5/7
या फिल्मनेही धुरंधर 2 सारखेच त्या काळातील यशाचे सर्व विक्रम मोडले होते. 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेली ही फिल्म. या फिल्मने 15 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्या काळातील हा एक मोठा आकडा होता. आजच्या काळात ही अनेकशे कोटींच्या घरात जाईल.
advertisement
6/7
ज्याप्रमाणे आज 'धुरंधर 2' मधील पात्रांची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे या फिल्ममधील पात्रांचीही झाली. किंबहुना आजही ती पात्रं लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. आजही ही फिल्म हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय फिल्म्सपैकी एक मानली जाते. या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन यांची भूमिका होती.
advertisement
7/7
कास्टची नावं वाचल्यावर ही फिल्म कोणती हे तुम्हाला आता समजलंच असेल. हो बरोबर... तुम्ही बरोबर ओळखलंत. ही फिल्म आहे शोले. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची ही फिल्म.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Film Story : 5 वर्षे थिएटरमध्ये चालली ही फिल्म, बजेटच्या पाचपट कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल