TRENDING:

Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांना बीएमसीकडून खास गिफ्ट, महापौरांची मोठी घोषणा

Last Updated:

Mumbai Dabbawala: महापौर रितू तावडे यांच्या घोषणेमुळे डबेवाल्यांच्या वेळेची बचत होणार असून, वितरण अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सायकलचे चाक आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईचे डबेवाले गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांची भूक भागवत आहेत. शिस्त, अचूकता आणि अविरत मेहनतीच्या जोरावर त्यांनी जगभरात ओळख निर्माण केली आहे. आता या डबेवाल्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेकडून डबेवाल्यांना विशेष 'गिफ्ट' देण्याची तयारी सुरू असून महापौर रितू तावडे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांना खास गिफ्ट, महापौर रितू तावडे यांची मोठी घोषणा
Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांना खास गिफ्ट, महापौर रितू तावडे यांची मोठी घोषणा
advertisement

वांद्रे येथील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’ला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की, डबेवाल्यांना 105 ई-बाइक्स देण्यात येणार आहेत. सध्या अनेक डबेवाल्यांना लांब अंतर सायकल किंवा पायी पार करावे लागते. ई-बाइक्समुळे त्यांच्या वेळेची बचत होणार असून, वितरण अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

advertisement

सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video

याच भेटीदरम्यान महापौरांनी डबेवाल्यांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. ‘सॉर्टिंग’ (डब्यांचे वर्गीकरण), ‘कोडिंग’ (विशिष्ट चिन्हांद्वारे ओळख) आणि अचूक वितरण या प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली. अत्यंत कमी साधनसामग्रीत आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादित वापरातही इतकी अचूक सेवा देणाऱ्या डबेवाल्यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

advertisement

मुंबईच्या वेशीवर चार प्रवेशद्वार

मुंबईच्या वेशींवर चार ठिकाणी भव्य प्रवेशद्वार उभारण्याचाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. यापैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित असणार आहे. या माध्यमातून डबेवाल्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या सेवेची ओळख शहराच्या प्रतीकात्मक रचनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डबेवाला सेवेचा इतिहास

1890 सालापासून सुरू होतो. वारकरी संप्रदायाशी जोडलेली ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात, तर कोविडपूर्व काळात ही संख्या जवळपास दुप्पट होती. लॉकडाऊनच्या कठीण काळात कामकाज ठप्प झाले असले, तरी मुंबईकरांसह देश-विदेशातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला.

advertisement

संकटातून सावरत आता डबेवाला सेवा पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे. महापौरांनीही “135 वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही सेवा कौतुकाच्या पलीकडची आहे,” असे सांगत त्यांच्या सांघिक कार्यशैलीचे आणि वेळेच्या अचूक नियोजनाचे विशेष कौतुक केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

ई-बाइक्ससारखी आधुनिक सुविधा आणि डबेवाला थीमवरील प्रवेशद्वार यांसारख्या उपक्रमांमुळे या परंपरेला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या सेवेचा प्रवास आता आधुनिकतेकडे वळताना दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांना बीएमसीकडून खास गिफ्ट, महापौरांची मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल